• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात CSR अंतर्गत अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 10, 2021
in जळगाव
0
Spread the love

(राजमुद्रा जळगाव) सुप्रीम इंडस्ट्रीचे सुप्रीम फाउंडेशन व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील सागर पार्क या मध्यवर्ती ठिकाणी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत महिला व पुरुषांसाठी अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छता गृहाचे भूमिपूजन आज महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते झाले. येत्या साडेतीन महिन्यांत हे काम पूर्णत्वास येणार असून नागरिकांची गैरसोय या प्रकल्पातुन कमी होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी सुप्रीमचे आभार मानत जळगाव शहराला दात्यांची परंपरा नेहमीच राहिलेली असून, वेळोवेळी दानशूर व्यक्तींसोबत महापालिका समाजाभिमुख कार्य करण्यास तत्पर असते असे वक्तव्य केले. नगरसेवक नितीन बरडे व अनंत जोशी या दोघांच्या पुढाकार व विशेष पाठपुराव्याने या कार्याला सुरुवात झाली असून लवकरच कमला सुरुवात होणार आहे.

सागर पार्क हा शहरवासीयांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण भाग असून येथे उभारल्या जाणार्‍या अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृहामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे. या प्रकल्पाचे काम उत्तमप्रतीचे व अतिशय आधुनिक सुविधांनी युक्त होईल अशी खात्री माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. या आधी फुले मार्केटजवळ जुन्या महानगर पालिकेच्या जागेवर सार्वजनिक शौचालय उभारले गेले असून आजतागायत ते सुस्थितीत आहे. सदर प्रकल्पासाठी काहीही अडचणी असल्यास जळगाव महापालिका सर्वतोपरी सहकार्य करेल असेही ते यावेळी म्हणाले.

सामाजिक दायित्वातून काम करण्याची सुप्रिम फाऊंडेशनची नेहमीच भूमिका राहिली आहे. संबंधित काम साडेतीन महिन्यांत पूर्णत्वास येईल. तसेच पुढील टप्प्यात रामदास कॉलनी व शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातही सार्वजनिक स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. सदरील कामे नुसतीच पूर्णत्वास आणणे हाच फक्त आमचा हेतू नसून यांची देखभालही तितकीच तन्मयतेने आम्ही करीत असतो. अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींसह नागरिकांकडून मिळणारे आशीर्वाद आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणारे असतात. सोबतच महापालिकेचे सहकार्यही आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे असल्याचे सुप्रिम इंडस्ट्रीचे महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई यांनी सांगितले.

याप्रसंगी सुप्रिम इंडस्ट्रीजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजय प्रभुदेसाई, जी.के. सक्सेना, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, उपायुक्त पवन पाटील, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, कैलास सोनवणे, प्रशांत नाईक, अ‍ॅड.शुचिता हाडा, दीपमाला काळे, सरिता माळी-कोल्हे, आर्किटेक्ट श्री.शिरीष बर्वे, महापालिकेचे शहर अभियंता अरविंद भोसले, मनपा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

Tags: aayukt satish kulkarnicsrmahapaur jayashree mahajannitin ladhdhaSupreme industrysuprim foundationupmahapaur kulbhushan patil
Previous Post

अमळनेरचे नगरसेवक निशांत अग्रवाल जुगार खेळताना रंगेहात अटकेत

Next Post

लॉकडाऊन हा एक प्रकारे उन्हाळ्यासाठी फायदेशीरच

Next Post

लॉकडाऊन हा एक प्रकारे उन्हाळ्यासाठी फायदेशीरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!