• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 22, 2021
in Uncategorized
0
रावेर येथे ऑलम्पिक खेळाडूंना शुभेच्छा
Spread the love

 

रावेर राजमुद्रा वृत्तसेवा | रावेर येथील पंचायत समिती सभागृहात ऑलिम्पिक जागरण अभियान अंतर्गत  युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय आणि विविध शिक्षण संस्था व क्लब तर्फे आयोजित कार्यक्रमात खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.

टोकियो  येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात महाराष्ट्रातील १० खेळाडू सहभागी आहेत. त्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समिती सभागृहात रावेर येथे बॅनर व सेल्फी पॉईंटचे अनावरण करण्यात आले. तसेच ऑलिंपिक अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. उदघाटन पंचायत समिती सभापती कविता कोळी, महाराष्ट्र मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे. के. पाटील, पंचायत समिती सदस्य जुम्‍मा तडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी शैलेश धनके, गटसमन्वयक खलील तडवी, हरलाल कोळी, संदिप सावळे, रुची मोटर्सचे संचालक अरुण अग्रवाल, मुख्याध्यापक बी. एस. मराठे, उपमुख्याध्यापक टी. बी. महाजन, केंद्रप्रमुख गणेश धांडे, शिक्षण विभागाचे प्रफुल्ल मानकर, रावेर तालुका क्रिडा समन्वयक ए. पी. पाटील उपस्थित होते.

यावेळी राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू अभिषेक महाजन, भावेश महाजन यांचा प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरदार जी. जी. स्पोर्टचे युवराज माळी, अजय महाजन, स्वामी स्पोर्टचे श्रीकांत महाजन, चिनावल हायस्कूलचे डी. आर. नेहते, ए. पी. पाटील यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे अध्यक्ष एम. एस. महाजन यांनी केले.

Tags: raver
Previous Post

हतनूर धरणाचे १२ दरवाजे पूर्ण उघडले

Next Post

केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची वसंत मुंडे यांनी घेतली भेट

Next Post
केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची वसंत मुंडे यांनी घेतली भेट

केंद्रीय राज्य अर्थमंत्री डॉ. भागवत कराड यांची वसंत मुंडे यांनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!