• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहरातील रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ

महापौर, उपमहापौरांनी दिलेल्या निर्देशांचे तातडीने पालन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
July 24, 2021
in जळगाव, महानगरपालिका, राजकीय
1
शहरातील रस्त्याच्या डागडुजीस प्रारंभ
Spread the love

 

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | पावसामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने बैठक घेऊन रस्ते दुरूस्तीच्या निर्देशांचे आजपासून पालन सुरू झाले आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये आजपासून रस्ते दुरूस्तीस प्रारंभ झाला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहराच्या बर्‍याच भागांमध्ये रस्त्यांची दुर्दशा झाली असून काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने बांधकाम खात्याची बैठक घेतली. यात महापालिका आयुक्तसतीश कुलकर्णी, शहर अभियंता अरविंद भोसले, प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले, प्रभाग अधिकारीसंजय पाटील, मनीष अमृतकर, योगेश वाणी, प्रकाश पाटील, मिलिंद जगताप यांच्यासह बांधकाम अभियंते यांच्यासह नगरसेवक नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर यावेळी उपस्थित होते.

शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठांसह विविध कॉलन्या तसेच उपनगरांतील रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजण्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तातडीने यावर कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.

या अनुषंगाने आज सकाळपासून शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची डागडुजी सुरू करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने भजे गल्ली, मेहरूण आदींसह अन्य भागांचा समावेश आहे. तर या संदर्भात बांधकाम खात्याशी संपर्क साधला असता आजपासून रस्ते दुरूस्ती सुरू झाली असून सोमवारपासून या कामांना वेग येणार असल्याचे सांगितले.

या संदर्भात उपमहापौर कुलभूषण पाटील म्हणाले की, जळगावकर नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. खराब रस्त्यांची तक्रार आल्यानंतर आम्ही तातडीने बैठक घेऊन यावर निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. याच प्रमाणे शहरातील विकासकामांना गती देण्यात येणार असून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिली.

Tags: dagdujijalgaonmahanagar palikamahapaur jayashree mahajanupmahapaur kulbhushan patil
Previous Post

‘त्या’ संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Next Post

नशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यलयाचे उद्धघाटन

Next Post
नशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यलयाचे उद्धघाटन

नशिराबादेत जळगाव ग्रामीण कार्यलयाचे उद्धघाटन

Comments 1

  1. Viiiiiiil says:
    4 years ago

    kanchan Nager , chaughule plote , wani mangal karyalay , ekde ghanta bhi koni dhunkun pahil nahiye koni
    Don diwas paus nay yenar gara korda zala ki zal
    Mag paus aala ki parat gara hona
    🍌Kam karte nagarpalika , fakt nawala aashwasan aahet he

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!