• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबईत डेल्टा प्लसचा पहिला बळी, महाराष्ट्रातून दुसरा..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 13, 2021
in महाराष्ट्र
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | मुंबईत करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली असून घाटकोपरमधील एका ६३ वर्षीय महिलेचा करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जुलै महिन्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डेल्टा व्हेरिएंटमुळे महाराष्ट्रात झालेला हा दुसरा मृत्यू असून यापूर्वी रत्नागिरीमधील एका ८० वर्षीय महिलेचा डेल्टा व्हेरिएंटमुळे १३ जून रोजी मृत्यू झाला होता.

मुंबईमधील या महिलेचा मृत्यू डेल्टा व्हेरिएंटमुळे झाल्याची माहिती ११ ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या कॉनटॅक्ट ट्रेसिंगमध्ये हा खुलासा झालाय. राज्याच्या आरोग्य विभागाने करोना रुग्णामधील जिनोम सिक्वेन्सींगच्या अभ्यासामध्ये सात जणांना डेल्टा प्लस व्हेरिएटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर महापालिकेने डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांचा शोध सुरु केला. याच चाचण्यांदरम्यान या महिलेचीही चाचणी घेण्यात आलेली. कुटुंबियांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार या महिलेचा मृत्यू २७ जुलै रोजी झाला. आता या महिलेच्या संपर्कात आलेल्या दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे.

“६३ वर्षीय महिला रुग्णाचा डेल्टा व्हेरिएंटमुळे मृत्यू झाला आहे. आम्ही या महिलेच्या जवळच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींचं कॉनटॅक्ट ट्रेसिंग केलं आहे. त्यापैकी सहाजण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या चाचण्यांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी दोघांना डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झालाय. इतरांच्या अहवालाची आम्ही वाट पाहत आहोत,” अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिलीय. डेल्टा व्हेरिएंटमुळे मुंबईत झालेला हा पहिला मृत्यू असल्याचंही गोमारे यांनी म्हटलं आहे.

या महिलेला श्वसनासंदर्भात त्रास असल्याने तिला घरीच ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. या महिलेने लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही तिची करोना चाचणी २१ जुलै रोजी पॉझिटीव्ह आली होती. २४ जुलै रोजी तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं जिथे तीन दिवसांच्या उपचारानंतर तिचा मृत्यू झाला.

एन वॉर्डचे आरोग्य अधिकारी डॉ. महिंद्रा खंडाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार मरण पावलेल्या महिलेला अधी विक्रोळीतील गोदरेज मेमेरियल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर तिला तिच्या नातेवाईकांनी ब्रिच कँण्डी रुग्णालयामध्ये दाखल केलं. दरम्यान या महिलेचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला.

डेल्डा प्लस हा करोनाचा सर्वात घातक व्हेरिएंट आहे. राज्यामध्ये बुधवारी डेल्टा प्लसचे २० रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी मुंबईमध्ये सात तर पुणे आणि ठाण्यात प्रत्येकी सहा रुग्ण आढळून आले आहेत. डेल्टा प्लसच्या एकूण रुग्णांची संख्या ६५ वर पोहचली आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण जळगावमध्ये आढळून आलेत. येथे डेल्टा प्लसचे १३ रुग्ण आढळले असून त्या खालोखाल रत्नागिरी (१२), मुंबई (११), ठाणे (६), पुणे (६) तसेच चंद्रपूर, अकोला, सिंधुदूर्ग, सांगली, नंदूरबार, औरंगाबाद, कोल्हापूर, बीडमध्येही रुग्ण आढळून आलेत. गोंदिया, नांदेड, रायगडमध्ये प्रत्येकी दोन तर पालघरमध्ये तीन रुग्ण आढळून आलेत.

Tags: coronadelta plusmaharashtramumbai
Previous Post

शिवाजी नगरात आयुष्यमान कार्ड संदर्भात राबवली मोहीम

Next Post

एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे – राहुल गांधी

Next Post

एक कंपनी म्हणून देशाचे राजकारण ठरवण्याचे काम ट्विटर करत आहे - राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!