• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खत बचत आयोजित मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे कृषि विभागाचे आवाहन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 12, 2021
in कृषी, जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love

(राजमुद्रा जळगाव) राज्यामध्ये रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या उद्देशाने खरिप 2021 मध्ये खत बचतीची विशेष मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. यामध्ये किमान 10 टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी मे महिन्याच्या चालु सप्ताहात या मोहीमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी विशेष प्रयत्न कृषि विभागामार्फत क्षेत्रियस्तरावर करण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

या मोहिमेंतर्गत शेतक-यांना विविध पिकांसाठी विशेषत: भात, सोयाबीन, कापुस, ऊस इत्यादीकरीता खत वापराचे विविध फायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर जमिन सुपिकता निर्देशांक दर्शविणारा फलक प्रदर्शित करणे व त्याचे सामुहीक वाचन करणे, जमिन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करणे, जैविक खतांची बीज प्रक्रीया करणे, हिरवळीच्या खतांच्या बियाणाचे अनुदानावर वितरण करणे, भात पिकाकरीता युरीया ब्रिकेटचा वापर वाढविण्यासाठी त्याचे उत्पादन व वितरण करणे, कृषि सेवा केंद्र चालकांना प्रशिक्षण देणे, जमिनीत सेंद्रिय कर्बाची वाढ होण्यासाठी उसाची पाचट जागेवर कुजविणे, व्हर्मीकंपोस्ट, गांडुळ खत, कंपोस्ट खत यांचा वापर वाढवुन रासायनिक खतांची मागणी कमी करणे. तसेच विविध पिक योजनांतर्गत प्रशिक्षण वर्ग व प्रात्यक्षिकांचे आयोजन करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त शेतक-यांनी सहभागी होण्यासाठी कृषि विभागाने जाहीर आवाहन केले आहे.

Tags: jalgaonkrushi vibhagmaharashtrarajmudra
Previous Post

मे आणि जून महिन्याचे रेशन एकत्र वाटप करण्याची गुप्ता यांची मागणी

Next Post

दुग्ध संघाचे एम.डी. लिमयेची नियुक्ती बोगस तर भरती प्रक्रिया कशाच्या आधारावर ?

Next Post

दुग्ध संघाचे एम.डी. लिमयेची नियुक्ती बोगस तर भरती प्रक्रिया कशाच्या आधारावर ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!