• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसह मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 17, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love


जळगाव, (जिमाका) दि. 17 – राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त व बाधितांना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.
महापूर, दरड कोसळणे व लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार आदि मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता आहे.
अशावेळी सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशाने स्थापन झालेल्या राज्यातील सर्व धर्मादाय संस्था (ट्रस्ट) यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे. जेणेकरुन गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधुन गरजूंना धर्मादाय संस्था यांनी शक्य ती मदत करण्याचे आवाहन प्र. श्रा. तरारे, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.
तसेच आर्थिक स्वरुपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत खालील बँक खात्यावर चेक किंवा धनादेशाव्दारे शक्य तितक्या लवकर द्यावी.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी बॅक खात्याचा तपशील
मुख्यमंत्री सहाय्यता निधी –
बचत खाते क्रमांक- 10972433751,
स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट,
मुंबई-400 001,
शाखा कोड- 00300,
आयएफएस कोड – SBIN0000300 असे आहेत.

तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व धर्मादाय संस्थांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून आवश्यक ती मदत तातडीने करावी. तसेच जास्तीत जास्त आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करावी. असे धर्मादाय उप आयुक्त (प्र.) जळगाव विभाग, जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्व्ये कळविले आहे.

Tags: jalgaon mukhyamantri nidhijilhadhikari abhijit raut
Previous Post

आ. चंद्रकांत पाटलांचा सरकारला घरचा आहेर

Next Post

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करा – खासदार उन्मेश पाटील यांचीमागणी

Next Post

जिल्ह्यातील चाळीस हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पुर्ण करा - खासदार उन्मेश पाटील यांचीमागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!