• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशकात विद्यार्थी डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाचा रॅगिंगचा आरोप..!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 18, 2021
in शैक्षणिक
0
Spread the love

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे चौकशीचे आदेश

नाशिक राजमुद्रा वृत्तसेवा | नाशिकमधील मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृत डॉक्टरांच्या कुटुंबाने रँगिंगमुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला असून डॉ. स्वप्निल महारुद्र शिंदे असं या मृत डॉक्टरांचं नाव आहे. स्वप्नील गायनॉकॉलॉजिच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंगमुळे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यामुळे आता राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मृत डॉक्टर स्वप्निल महारुद्र शिंदे यांच्या कुटुंबाने रॅगिंग करणाऱ्या २ मुलींसह कॉलेज प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कॉलेज प्रशासनाने मात्र, कुटुंबाच्या आरोपांचं खंडन केले असून आत्महत्या केलेल्या विद्यार्थी डॉक्टरला वेळो वेळी सहकार्य केल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे. तसेच मृत विद्यार्थी डॉक्टरवर मानसोपचार सुरू असल्याचंही कॉलेज प्रशासनाने म्हटलं आहे. मानसिक स्थिती ठीक नसल्याने मृत डॉक्टर विद्यार्थ्यांच्या आईला मुलासोबत होस्टेलमध्ये राहण्याची परवानगी दिल्याचाही दावा कॉलेजने केला आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. देशमुख म्हणाले, “हा मृत्यू नेमका का झाला, कशामुळे झाला याची अधिकृत माहिती आलेली नाही. पालकांचं म्हणणं एक आहे, महाविद्यालयाचं म्हणणं एक आहे. याची चौकशी शासन स्तरावर घोषित करण्यात येत आहे. सरकार या प्रकरणाची चौकशी करेल. रॅगिंग या प्रकारात खूप नियंत्रण मिळवलं आहे. याबाबत प्रतिबंध शासनाने घातले आहेत. हा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पोस्ट मोर्टम व्हायचं आहे. दरम्यान मृत डॉक्टरांच्या पालकांशी संवाद साधण्यात येईल.” असे ते म्हणाले.

Tags: amit deshmukhdoctornashik
Previous Post

अपूर्ण माहितीच्या आधारावर माझ्यावर आरोप लावले जात आहेत – जिल्हा शल्यचिकित्सक एन एस चव्हाण

Next Post

जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा पोलीस अधिकारी बदलून येणार

Next Post
पोलीस ठाण्यात गुन्हेगारच ठरत आहे प्रभावशाली …!

जळगाव जिल्ह्यात नव्याने सहा पोलीस अधिकारी बदलून येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!