• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

लोक सहभागातून खर्ची खु येथे ‘ध्येय अभ्यासिका’

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 18, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भारताच्या स्वतंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त एरंडोल तालुक्यातील खर्ची खु येथे ध्येय अभ्यासिकेचे लोकसहभागातून निर्माण करण्यात आले. खर्ची खु. येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या तयारी करता यावी या उद्देशाने ध्येय अभ्यासिकेचे लोकार्पण करण्यात आले.

गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून “ध्येय अभ्यासिका” सुरू करण्यात आली. गावातच अभ्यास करण्यासाठी व पुस्तकांची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने अभ्यासिकेचे उद्घाटन जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून व फित कापून करण्यात आले. नाना महाजन यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. चांगला विद्यार्थी घडविण्यासाठी चांगली पुस्तके वाचली पाहिजे यातून समाज घडतो परिणामी आपल्या गावाचा विकास होण्यास हातभार लागतो. यासाठी ध्येय अभ्यासिकेचा सदुपयोग करून गावातील विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवावे असे आवाहनही नाना महाजन यांनी केले.

खर्ची खु. येथील ध्येय अभ्यासिकेसाठी जि. प. सदस्य नाना महाजन, पारोळा नगराध्यक्ष करण पवार, माजी सैनिक भिला माळी, किशोर, जगण बापू, प्रगतशील शेतकरी अजीत पाटील, पेट्रोलपंप संचालक समाधान पाटील यांनी देणग्या दिल्या असून १४,२०० रूपये यातून जमा झाले आहेत. अभ्यासिकेसाठी या उपयोग केला जात आहे.

दरम्यान पारोळाचे नगराध्यक्ष करण पवार यांनी फोनद्वारे उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात. उद्घाटनप्रसंगी माजी सैनिक भिला माळी, प्रगतशील शेतकरी अजित पाटील, संतोष घोळके, किशोर माळी, संदिप राजपुत, बापू भिल आदी ग्रामस्थ व युवक उपस्थीत होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सूर्यवंशी यांनी केले. अक्षय पाटील यांनी आभार मानले.

Tags: jalgaon
Previous Post

भंगार विक्रीतून रेल्वे प्रशासनाला ३९१ कोटीचे उत्पन्न

Next Post

औरंगाबाद उद्योजकाला मारहाणीचा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निषेध

Next Post

औरंगाबाद उद्योजकाला मारहाणीचा जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!