• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले मदिरालयांवर ज्यांचा…!

Kamlesh Devre by Kamlesh Devre
August 21, 2021
in राजकीय
0
सुधीर मुनगंटीवारांचा राज्य सरकारला टोला; म्हणाले मदिरालयांवर ज्यांचा…!
Spread the love

 

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील दुकानं, हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट्स आदिंना कोरोना नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील मंदिरं आणि अन्य धार्मिक स्थळं बंदच ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मंदिराच्या मुद्द्यावरुन आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंदिरे उघडण्याची मागणी केल्यानंतर आता माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मंदिरांबाबत राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मदिरालयांवर ज्यांचा विश्वास त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही. दारुवाल्यांना सूट देणारं, बार मालकांना सूट देणारं हे देशातील पहिलं राज्य सरकार आहे. हे जगातले एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, जे बीअर बार आणि दारुमालकांना सूट देतात. मेट्रोचं उद्धाटन चालतं, पुण्यातील कार्यालयाचं उद्घाटन चालतं, डान्सबार सुरु केले तरी यांना चालतं, त्यामुळे कोरोना होत नाही का? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केलाय. दुसरीकडे जनआशीर्वाद यात्रा केली तर कोरोना येतो असं राज्यातील थोर नेत्यांना वाटत असल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली आहे.

जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी ही यात्रा आहे. जनतेचा आशीर्वाद भाजप-शिवसेनेवर होता. पण त्याविरोधात काम करणाऱ्यांना काय माहिती, असा टोलाही मुनगंटीवारांनी शिवसेनेला लगावलाय. किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्याच्या बाबतीत बोलतांना ते म्हणाले, भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गानं त्यांना उत्तर देता येत नाही, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर जोरदार टीक केली आहे.

फडणवीस यांनींही याबाबत आरोप प्रत्यारोप केले असून, आमच्यासाठी सगळीकडे देव आहे. मात्र, अनेक गरीब लोकांची उपजीविका मंदिरांवर अवलंबून आहे. हारवाल्यापासून ते पुजारी अशा अनेकांची उपजीविका ही मंदिरांवर अवलंबून असते. त्यांच्यासाठी तरी मंदिरं उघडा. मंदिरं बंद ठेवणे ही सरकारची चूक आहे. तुम्ही दारुची दुकानं सुरु ठेवता आणि मंदिरं बंद ठेवता, अशा शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला होता. शेकापचे दिवंगत नेते गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी आणि सुधारकरपंत परिचारक यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त देवेंद्र फडणवीस पंढरपुरात आले होते. गणपतराव देशमुख यांचं विधिमंडळात उचित स्मारक करण्याची मागणी करणार असल्याचंही यावेळी फडणवीस म्हणाले. शाळा सुरु करण्याच्या निर्णयाबाबत सरकार धरसोड करत आहे. पालकांना आणि विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा असंही फडणवीस यांनी म्हटलंय.

Tags: devendra fadanvismukhyamantri uddhav thakremumbairajya sarkarsudhir mungantivar
Previous Post

चोरट्यांनी पळवले चक्क देव्हाऱ्यातील देव; पोलिसांपुढे आव्हान..

Next Post

भाजप युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवती तर्फे डॉक्टरांना राखी

Next Post
भाजप युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवती तर्फे डॉक्टरांना राखी

भाजप युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर युवती तर्फे डॉक्टरांना राखी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!