• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केशवस्मृती प्रतिष्ठान वर्धापन दिना निमित्त कोरोना योद्धांचा सन्मान

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 13, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा) सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केशवस्मृती प्रतिष्ठानचा ३० वा वर्धापन दिन दि ९ मे रोजी साजरा करण्यात आला. यावर्षी लॉकडाऊन व सार्वजनिक कार्यक्रम करण्यास मर्यादा असल्याने, या वर्धापन दिनाचे औचित्य साधत गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या कालखंडात सातत्याने जनतेला सेवा देणाऱ्या कोरोना योद्धांचा सन्मान करण्याचे ठरविले. देशभरात सर्वत्र लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. अनेक ओद्योगिक आस्थापने, व्यावसायिक उपक्रम बंद ठेवण्यात आले होते मात्र त्याचवेळी पोलिस, बँक कर्मचारी व पेट्रोल पंपावर काम करणारे कर्मचारी हे अव्याहतपणे सेवा नागरिकांना देत होते. कोरोनाचा कालखंड असतांना देखील या योद्ध्यांनी खऱ्या अर्थाने नागरिकांना सेवा दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जळगाव शहरातील सर्व पोलिस स्टेशन मधील कार्यरत प्रमुख अधिकारी व कर्मचारी, पेट्रोल पंपावर सेवा देणारे कर्मचारी, यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कामकाजाचे कौतुक करत सन्मानपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची केशवस्मृतीच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पोलिस दलाने केलेल्या कामाचे कौतुक केले.

दि ९ ते ११ मे दरम्यान दुपारी ४.३० वाजता सामाजिक संस्थासाठी ३ दिवसीय ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. दि ९ मे रोजी मुंबई येथील शैलेश निपुणगे यांनी केंद्र सरकारने सामाजिक सामाजिक संस्थासाठी केलेले नविन कायदे व दि. १० मे रोजी सामाजिक संस्थासाठी सोशल मिडियाचा प्रभावी उपयोग या विषयावर मुंबईतील मिलिंद आरोलकर यांनी माहिती दिली.

केशवस्मृती सेवासंथा समूहातील कार्यरत सर्व संचालक व सहकारी यांचेशी सेवासंस्था प्रमुख भरत अमळकर यांनी ऑनलाइन संवाद साधत केशवस्मृतीचा ३० वर्षाचा प्रवास सांगितला. खासदार उन्मेष पाटील, खासदार श्रीमती रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, माजी खासदार डॉ उल्हास पाटील यांच्यासह सामाजिक, राजकिय, वैद्यकीय, पत्रकारिता, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांनी केशवस्मृतीस ३० वर्षाच्या वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

Tags: coronacorona yodhhejalgaonkeshav smruti pratishtanrajmudra
Previous Post

मोटरसायकल चोरी करणारा आरोपी गुन्हे शाखेकडून गजाआड

Next Post

झोपडपट्टी पुनर्वसन भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा…

Next Post

झोपडपट्टी पुनर्वसन भ्रष्टाचाराची चौकशी करा अन्यथा…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!