• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेतकर्‍याची हतबलता कमी कर ; कोरोना रुपी संकटातून मुक्त कर : महापौरांचे साकडे

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 6, 2021
in जळगाव
0
शेतकर्‍याची हतबलता कमी कर ; कोरोना रुपी संकटातून मुक्त कर : महापौरांचे साकडे
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृतसेवा | पोळ्यानिमित्त आज दि.6 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन व महापालिकेतील विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन यांनी आपल्या मेहरूणमधील निवासस्थानी अंगणात सडा, रांगोळीसह फुलमाळांची सजावट करून शेतकर्‍यांचे दैवत मानल्या जाणार्‍या बैलांची ढोल-ताशांच्या गजरात बैलपूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांच्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली.

याप्रसंगी महापौरांनी सांगितले, की हिंदू धर्मातील वर्षभरात येणार्‍या सणांपैकी आमच्या महाजन परिवारातील पणजोबा, आजोबा अन् आता सासू-सासर्‍यांसह आम्ही पोळा सण अतिशय महत्त्वपूर्ण मानून साजरा करीत असतो. महापौर झाल्यानंतर हा माझ्यासाठी पहिलाच प्रसंग आहे. त्यामुळे संपूर्ण परिवारासह परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. अलीकडे अवकाळी पावसासह विविध सुलतानी संकटांमुळे शेतकर्‍याची हतबलता कमी व्हावी, त्याने अन्न-धान्य पिकवून सर्वत्र सुजलाम् सुफलाम् व्हावे तसेच कोरोनारूपी संकटातूनही आम्हा सर्वांची कायमची मुक्तता व्हावी यासाठी परमेश्वराला मी नतमस्तक होऊन प्रार्थना करते व समस्त शेतकरी बांधव तसेच जळगावकरांना पोळ्याच्या शुभेच्छा देते. याप्रसंगी आप्तेष्ट, परिसरातील रहिवाश्यांसह महाजन परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: bail pujan pokhajalaon jilhamahapalika jalgaonmahapur jayshri mahajanupmahapour kulbhushan patil
Previous Post

प्रभाकर सुकलाल सिनकर (सर) यांना तालुकास्तरीय आदर्श क्रियाशील शिक्षक पुरस्कार प्रदान ..

Next Post

धक्कादायक : पावसाच्या पुरात चाळीसगावात एक-दोन लाख नाही, तर एवढी मोठी रक्कम भिजली..

Next Post

धक्कादायक : पावसाच्या पुरात चाळीसगावात एक-दोन लाख नाही, तर एवढी मोठी रक्कम भिजली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!