• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव करांनो सावधान ; कठोर कार्यवाही शिवाय पर्याय नाही – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 15, 2021
in जळगाव
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची प्रशासनातील सर्व घटक पूर्ण ताकदीने अंमलबजावणी करीत असूनही बाधित रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही, ही चिंतेची बाब आहे. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापुढे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने नियमांचे पालन करावे. अन्यथा प्रशासनास कठोर कारवाई शिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही. असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिला.

येथील पोलीस मुख्यालयातील प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भीमाशंकर जमादार, महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रशासन निर्बंधांची अंमलबजावणी प्रभावीपणे करत असूनही जिल्ह्यात काही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली विनाकारण घराबाहेर पडत असून परिणामी असे नागरिक स्वत:बरोबरच दुसऱ्यांनाही बाधित करतात. लसीकरणासाठी अनावश्यक गर्दी करणारे नागरिक, कोरोना बाधित रुग्णांसोबत दवाखान्यात गर्दी करणारे नातेवाईंक, अरुंद गल्ली बोळांत बेकायदेशीरपणे भाजीपाला विक्रेते थाटत असलेली दुकाने आणि त्यावर होणारी गर्दी, काही नागरिक 7 ते 11 वाजेदरम्यान किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्री दुकानांवर विनाकारण गर्दी करणारे नागरिक यांच्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडथळे येत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, प्रशासनाने या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून 31 मे पर्यंत लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला असून तसे आदेश सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

लसीकरणासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आरोग्य विभागाने उपलब्ध डोसनुसार आदल्या दिवशीच दुपारी 4 वाजेनंतर संबंधित लसीकरण केंद्रांवर कुपनचे वाटप करावे, म्हणजे दुस-या दिवशी अनावश्यक होणारी गर्दी टाळता येईल. शिवाय सर्वांना लस उपलब्ध होईल. कोरोना रुग्णांची आरोग्य विभागाकडून आवश्यक ती काळजी घेतली जात आहे असा विश्वास त्यांच्या नातेवाईंकांना वाटावा यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईंकांमध्ये व्हीडीओ काॅलद्वारे संवाद साधून द्यावा जेणेकरून नातेवाईक रुग्णांना भेटण्यासाठी दवाखान्यात येण्याचा आग्रह धरणार नाहीत. यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहे.

Tags: aayukt satish kulkarnijalgaon coronajalgaon polisjalgaon prashasanjilha aarogya adhikari jamadarjilha polis ashikshk pravin madhejilhadhikari abhijit rautkumar chintamahapalika jalgaonsantosh wahule
Previous Post

एमआयडीसी मधील त्या तीन कामगारांच्या मृत्यूची चौकशी ; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

Next Post

देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

Next Post

देवेंद्र फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!