• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

साक्रीत चोरट्यांकडून चार लाख 50 हजारांच्या दुचाकी जप्त

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 23, 2021
in क्राईम, धुळे
0
साक्रीत चोरट्यांकडून चार लाख 50 हजारांच्या दुचाकी जप्त
Spread the love

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा : साक्री शहरातील कॉलनी परिसरासह विविध ठिकाणांहून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणार्‍या टोळीतील तीन संशयितांना साक्री पोलिसांनी अटक केली. तिन्ही संशयितांकडून चार लाख 50 हजार रुपयांच्या 13 दुचाकी जप्त करण्यात आल्यात. साक्री शहरातील मुकुंदनगर, आंबापूर रोड येथून काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीस गेल्याची तक्रार साक्री पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. शहर परिसरातून आणखी काही दुचाकी चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेतला जात होता. याबाबत पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानंसार निरीक्षक आहेर यांनी भावेश यशवंत हिरे (रा.गणेशपूर, ता.साक्री), राहुल रमेश भावसार (रा.भाडणे, ता.साक्री) व ज्ञानेश्‍वर गोरख सोनवणे (रा.साक्री) या तिघांना ताब्यात घेतले. तिन्ही संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. तसेच साक्री शहरासह परिसरातून चोरी केलेल्या 13 दुचाकी कुठे विक्री केल्यात याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी वेगवेगळ्या कंपनीच्या सुमारे चार लाख 50 हजार रुपयांच्या 13 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली साक्रीचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, उपनिरीक्षक बी. बी. नर्‍हे, उपनिरीक्षक आर. बी. निकम, हवालदार बापू रायते, कॉन्स्टेबल सुनील अहिरे, चेतन गोसावी, तुषार जाधव आदींनी ही कारवाई केली.

Tags: choricrime newsmotorcycle chorisakri dhule news
Previous Post

खा.ओवेसींच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ धुळ्यात एमआयएमचा मोर्चा

Next Post

हिरे रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी समाजवादी पार्टीची निदर्शने

Next Post
हिरे रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी समाजवादी पार्टीची निदर्शने

हिरे रुग्णालयातील विविध समस्या सोडविण्यासाठी समाजवादी पार्टीची निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!