• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in जळगाव
0
महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार…
Spread the love

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा । शहरातून अग्रवाल चौकात जाणाऱ्या महामार्गाचे काम सध्या सुरू असून, अग्रवाल हाॅस्पिटलसमाेरील चाैकात महामार्गावर नाल्याचे सदाेष बांधकाम करण्यात आले आहे. या नाल्यामुळे नवीन समस्या निर्माण झाली आहे. याबाबत जळगाव फर्स्टचे डाॅ. राधेश्याम चाैधरी व परिसरातील नागरिकांनी महामार्गावर येऊन नाल्याबाबतची अडचण प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. तसेच यासंदर्भांत जळगाव फास्ट जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

अग्रवाल हाॅस्पिटल समाेरील चाैकात अंडरपासचे काम सुरू आहे.  आधीच्या अंडरपासचे काम पूर्ण झाल्यानंतर जळगावकरांच्या मागणीनुसार शेजारीच दुसरा एक अंडरपास तयार केला जाताे आहे. या अंडरपासजवळून रस्ता ओलांडून जाणारा नाला मध्येच दाेन ठिकाणी काटकाेनात जाेडण्यात आला आहे.  आधीच्या नाल्यापेक्षा नव्याने केलेला नाला खाेल आहे. त्यामुळे येथे पाणी साचून डासांची उत्पत्ती वाढणार आहे.  नाल्याचा तळ हा नव्याने बनवलेल्या ड्रेनेजपेक्षा किमान दीड फूट खोल आहे. या नाल्याचा प्रवाह नवीन ड्रेनेजमधे काटकोनात जोडला आहे. तसेच पुढे जाऊन तो प्रवाह समोरील प्रवाहाबरोबर पुन्हा काटकोनातून मुख्य नाल्यात पुलाखालून जोडला आहे. नवीन ड्रेनेज मुख्य रस्त्यापासून समांतर रस्त्याच्या मधोमध जमिनीच्या स्तरापासून अडीच ते तीन फूट उंच आहे. त्यामुळे नऊ मीटरचा समांतर-सेवा रस्ता दुभागून ४-५ मीटर एवढाच उरतो. भविष्यातील अडचण लक्षात घेऊन या नाल्याबाबत नागरिकांच्या सूचनांनुसार सुधारणा करण्याची मागणी जळगाव फर्स्टचे समन्वयक डाॅ.राधेश्याम चाैधरी यांनी केली अाहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तांत्रिक पुराव्यासह लेखी तक्रार करणार असल्याचे डाॅ. चाैधरी यांनी म्हटले आहे  या वेळी स्थानिक रहिवासी भरत अमळकर, डाॅ. मिलिंद काेल्हे, डाॅ. प्रशांत साठे, दीपक परदेशी, नितीन पाटील, अमित भाटिया उपस्थित हाेते.

 

Tags: abhijit raut
Previous Post

महापालिकेत फेरमूल्यांकनाची प्रक्रिया सुरू…

Next Post

राज ठाकरे म्हणतात… नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या

Next Post
राज ठाकरे म्हणतात… नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या

राज ठाकरे म्हणतात... नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!