• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज ठाकरे म्हणतात… नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या

Kamlesh Devre by Kamlesh Devre
September 30, 2021
in राजकीय
0
राज ठाकरे म्हणतात… नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार द्या
Spread the love

मुंबई राजमुद्रा वृत्तसेवा । पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून शेतकऱ्यांना भरघोस भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना पत्र लिहून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जर 50 हजार रुपये केंद्रानं राज्य आपत्ती निधीतून द्यायला सांगितले असेल तर ते देता येईल, कारण केंद्राकडूनच हा निधी दिला जातो. केंद्र सरकारनं दुजाभाव करु नये. कारण आम्ही पैसे मागितले तर पैसे मिळत नाही. पण काही राज्यांना पैसे न मागता दिले जातात हे अयोग्य आहे, असं अजित पवार म्हणाले.

वेगवेगळ्या पक्षांकडून वेगवेगळी मागणी केली जातेय. पण महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभी आहे. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे कसे मिळवता येतील याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आलेत. प्रत्येक पालकमंत्री त्या त्या भागाच्या दौऱ्यावर आहेत. अडचणीतील माणसाला मदत करायचं‌ काम सुरु आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं.

कधी कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तर कधी उत्तर महाराष्ट्रात महापूर-ढगफुटीचे थैमान सुरु आहे. आता ‘गुलाब’ चक्रीवादळाने विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात हाहाकार उडवला आहे. धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र लिहून शेतकऱ्यांसाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे

 

Tags: raj thakare
Previous Post

महामार्गावरील सदाेष नाल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रार…

Next Post

फडणवीसांच्या योजनेवर प्रश्न ? मराठवाड्यात ‘जलयुक्त शिवार’मुळे महापूर…

Next Post
फडणवीसांच्या योजनेवर प्रश्न ? मराठवाड्यात ‘जलयुक्त शिवार’मुळे महापूर…

फडणवीसांच्या योजनेवर प्रश्न ? मराठवाड्यात ‘जलयुक्त शिवार’मुळे महापूर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!