• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावात रस्त्यावर थुंकताय , होणार दंडात्मक कारवाई ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 1, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यातील जातीवाचक गाव आणि त्यांची नावे तातडीने बदल करा – जिल्हाधिकारी
Spread the love


जळगाव राजमुद्रा न्यूज | जिल्ह्यात तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयाच्या परीसरात कोणी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करीत असतील अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकत असतील अशा व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करावी. असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेत. यापुढे रस्त्यावर सुटणार यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर चाप बसणार का याकडे आता लक्ष लागले आहे अनेक ठिकाणी सार्वजनिक स्थळावर नागरिक तंबाखूजन्य पदार्थ सेवन करताना दिसून येते आहे. यामुळे सभोवतालचा परिसरात अस्वच्छता होत आहे.


येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा मौखिक आरोग्य व तंबाखू नियंत्रण समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ऑनलाईन पार पडली, यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भीमाशंकर जमादार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पांढरे, श्रीमती विद्या राजपूत, डॉ नितीन एस भारती, जिल्हा सल्लागार, निशा कटरे, सायकॉलॉजीस्ट, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हे प्रत्यक्ष उपस्थित होते. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा समितीचे उपाध्यक्ष डॉ पंकज आशिया, अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त योगेश बेंडकुळे, अशासकीय सदस्य नरेंद्र पाटील, डॉ गोविंद मंत्री, मुकुंद गोसावी, राज मोहम्मद खान शिकलकर, श्रीमती गोस्वामी, प्राचार्य, का ऊ कोल्हे विद्यालय, सलाम मुंबई फाऊंडेशन, पोलीस, गटविकास अधिकारी, तहसीलदार, आरोग्य अधिकारी, मनपा, जळगाव, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी हे दूरचित्रवाणीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, तालुकास्तरावर तालुका तंबाखू नियंत्रण समन्वय समितीने या कार्यक्रमाबाबत बैठक आयोजित करून आपल्या तालुक्यात हा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा. यासोबतच मौखिक आरोग्याची जनजागृती करताना लहान मुलांच्या दंत व मौखिक आरोग्यावर विशेष भर द्यावा. सर्व शासकीय विभाग / कार्यालय प्रमुख यांचे सोबतच पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने कोटपा कायद्यातील विविध कलमातंर्गत कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत. बैठकीच्या प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी कार्यक्रमाचे महत्त्व आणि सुरू असलेल्या उपक्रमांबाबत माहिती दिली. तंबाखू मुक्त शैक्षणिक संस्था उपक्रमातील yellow line campaign करिता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत एका शाळेमध्ये हा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती दिली.

जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ संपदा गोस्वामी यांनी मौखिक आरोग्य कार्यक्रमातील उपक्रमाचे महत्त्व व उपक्रमाबाबत सांगितले. तर जनजागृती सोबतच तंबाखू मुक्त शाळांचा उपक्रम जिल्हाभर राबवून शिक्षण विभागाच्या सहकार्यानें जिल्ह्यातील अधिकाधिक शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समितीचे अशासकीय सदस्य श्री राज मोहम्मद खान शिकलकर यांनी बैठकीत सांगितले.

Tags: aarogy jalgaonjalgaonjalgaon jilha jilhadhikri abhijit rautkarywahi
Previous Post

पंचायत राज समितीकडे तक्रारींचा पाऊस…

Next Post

सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले…

Next Post
सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले…

सर्वोच्च न्यायालयाने किसान महापंचायतीला फटकारले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!