• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार

एकनाथ खडसे यांच्या पाठपुराव्याला यश

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 4, 2021
in राजकीय
0
मंत्री जयंत पाटील यांची घोषणा ; अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देणार
Spread the love

मुक्ताईनगर राजमुद्रा वृत्तसेवा । मुक्ताईनगरसह जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्प पूर्णत्वात येत असून, राहिलेली कामे पूर्ण करण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. रोहिणी खडसे  सतत प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे आम्ही सरकार म्हणून या योजनांना प्राधान्याने निधी देऊन पूर्णत्वास नेऊ, अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली.

तालुक्यातील वढोदा वनक्षेत्राच्या हद्दीतील गोरक्षगंगा नदीवर असलेल्या जोंधनखेडा कुंड धरणाचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरसद्वारे तर प्रत्यक्षात धरण स्थळी माजी महसूल, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे – खेवलकर, भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ, गोटू महाजन, सरचिटणीस ईश्वर रहाणे, अशोक पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, मुक्ताईनगर पंचायत समिती सभापती सुनीता चौधरी, बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, राष्ट्रवादी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुंड धरणाच्या भिंतीची उंची वाढविण्यासाठी आणि सांडव्याचे उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी ३० कोटी ८४ लाख रुपये निधी मंजूर करून आणल्याबद्दल माजी मंत्री खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील, ॲड. रोहिणी खडसे यांचा कुऱ्हा-वढोदा परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष ॲड. पाटील म्हणाले, की ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने पक्षाची गावखेड्यात ताकद वाढली असून, येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व सहकार क्षेत्रातील निवडणुकांत राष्ट्रवादीला यश मिळेल.

 

Tags: jaynat patil
Previous Post

शाळांमधील किलबिलाट पुन्हा सुरू…. विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत

Next Post

मनसेचे पालिकेसमोर समोर ‘झोपा काढा’ आंदोलन

Next Post
मनसेचे पालिकेसमोर समोर ‘झोपा काढा’ आंदोलन

मनसेचे पालिकेसमोर समोर ‘झोपा काढा’ आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!