• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी – आ. किशोर पाटील

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in Uncategorized
0
पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्यावी – आ. किशोर पाटील
Spread the love

पाचोरा राजमुद्रा वृत्तसेवा ।  पाचोरा-भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून सप्टेंबर 2019 मधे पश्चिम महाराष्ट्रसाठी देण्यात आलेल्या एनआरएफ मदतीच्या निकषाच्या तिन पट मदत द्यावी अशी मागणी आमदार कीशोर पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन केली.

कापुस, मका, सोयाबीन, मुंग, उडीद सर्व पिक पाण्यात बुडाली आहे. त्यामुळे शेतकर्याना खरीप हंगामातुन खर्च ही निघण्यासारखी परीस्थीती नाही. याबाबत आमदार कीशोर पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधुन शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा करून त्यांना आश्वास्थ करत मुख्यमंत्र्यांना भेटून दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुबंईत भेट घेऊन शेतकऱ्यांची कैफीयत त्याच्यांकडे मांडली. दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून दिलासा देण्यासाठी आणि रब्बी पेरणीसाठी तत्काळ भरीव मदत देण्याची मागणी केली.  आमदार कीशोर पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचीही भेट घेतली. त्याच्यांकडे त्यांनी ओला दुष्काळाची आणि भरीव मदतीची मागणी केली. तर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याबाबत आग्रही भुमिका मांडली. याशिवाय त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी मुक्ताईनगर आमदार चंद्रकांत पाटील , पाचोऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहील,  स्वीय सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते. दरम्यान उद्या आमदार कीशोर पाटील हे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन तत्काळ भरपाई मिळण्याबाबत आग्रही भुमिका मांडणार असल्याचे आमदार कीशोर पाटील यांनी सांगीतले. याशिवाय राज्याच्या मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची ही भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

 

Tags: kishor patil
Previous Post

हवंन, पूजा करून नुकसान थांबवण्यासाठी जागृत महिला संघटनेची नदी मातेला आराधना…

Next Post

जळगावच्या भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पटकावली सुवर्णपदके!

Next Post
जळगावच्या भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पटकावली सुवर्णपदके!

जळगावच्या भावंडांनी आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पटकावली सुवर्णपदके!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!