• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in धुळे
0
धरती देवरेंचा पोटनिवडणुकीत प्रचंड मताधिक्याने विजय
Spread the love

धुळे राजमुद्रा वृत्तसेवा । गुजरातचे  भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार सी. आर. पाटील  यांची लेक व धुळ्याच्या सासरवासी भाजपच्या उमेदवार धरती निखिल देवरे यांनी जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत लामकानी (ता. धुळे) गटात शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव करत सरासरी चार हजारांहून अधिक मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. धरती देवरे या पोटनिवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती होत्या.

लेकीच्या प्रचारासाठीही खास विमानाने २७ सप्टेंबरला जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेले खासदार सी. आर. पाटील यांनी बोरीस (ता. धुळे) येथील सभेत जागतिक कन्या दिनाचे निमित्त साधत गावातील लेकींचा सुकन्या योजनेंतर्गत पहिला हप्ता मी भरतो, असे सांगून विशेष गिफ्ट दिले होते. खासदार पाटील यांची ही जादू लामकानी गटात कामी आली आणि लेकिच्या विजयालाही हातभार लागला, असे म्हटले तर वावगे म्हणू नये. तसेच महिला व बालविकास समिती सभापती असताना धरती देवरे यांनी चांगली कामगिरी केली होती. त्यांचे सासरे भाजपचे स्थानिक नेते सुभाष देवरे, पती उद्योजक निखिल देवरे, दीर व बोरीसचे माजी सरपंच विलास देवरे यांची भक्कम साथ धरती देवरे यांना लाभत आल्याने त्यांनी विकास कामांचा लामकानी गटात चांगला धडका लावला होता. विशेष म्हणजे नेते सुभाष देवरे यांचे भाचे कुणाल पाटील हे धुळे तालुका म्हणजेच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आहेत. त्यात लामकानी गटात भाजपच्या धरती देवरे यांच्यापुढे शिवसेनेच्या मिनाबाई पाटील यांचे आव्हान होते. राज्यस्तरावरील महाविकास आघाडीमुळे लामकानी गटात शिवसेनेचा उमेदवार देण्यात आला. महाविकास आघाडीमधील घटक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने धुळे तालुक्यात अंतर्गत सामंजस्यातून जागा वाटपाची भूमिका घेतली.

धुळे जिल्हा परिषदेच्या १५ गटांच्या पोटनिवडणुकीत ४२ पैकी ४१ उमेदवार, तर चार पंचायत समित्यांच्या ३० जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात आहेत. बोरकुंड (ता. धुळे) गटात शिवसेनेच्या शालिनी बाळासाहेब भदाणे या माघारी प्रक्रियेवेळीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. शिरपूर तालुक्यात आठ गणांसाठी पोटनिवडणूक होती. त्यात भाजपच्या दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या, मतमोजणीअंती सहा जागा भाजपने जिंकल्यामुळे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार अमरिशभाई पटेल यांनी त्यांचे वर्चस्व अबाधित राखल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आमदार पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर शिरपूर पंचायत समितीमध्ये प्रथमच भाजपची सत्ता आली आहे.

 

Previous Post

अमृत योजनेचे काम दोन महिन्यात पूर्ण होणार….

Next Post

खा.रक्षा खडसे कडाडल्या…याला राज्यसरकार जबाबदार

Next Post
खा.रक्षा खडसे कडाडल्या…याला राज्यसरकार जबाबदार

खा.रक्षा खडसे कडाडल्या...याला राज्यसरकार जबाबदार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!