• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंना दिलेल्या दिव्यांग सर्टिफिकेटची चौकशी करा मालपुरे यांची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 6, 2021
in जळगाव
0
खडसेंना दिलेल्या दिव्यांग सर्टिफिकेटची चौकशी करा मालपुरे यांची मागणी
Spread the love

जळगाव राजमृद्रा वृत्तसेवा । राष्टवादी नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना देण्यात आलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी महानगरप्रमुख गजानन मालपूरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय अधिष्ठाता यांचेकडे माहिती अधिकारात माहिती मागविली आहे.

राष्टवादीचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे अपंगत्वाचा दाखला आला कुठून ? असा प्रश्न उपस्थित करून माजी मंत्री गिरीष महाजन यांनी चक्क खडसेंच्या अपंगत्वाचा दाखलाच प्रसारमाध्यमांसमोर दाखविला होतो. आता या प्रकरणात शिवसेनेचे गजानन मालपूरे यांनी अधिक माहिती घेण्यासाठी शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय अधिष्ठाता यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज केला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, एकनाथराव खडसे हे राज्यातील वजनदार नेते आहे. त्यांनी दि. 12 ऑगस्ट रोजी अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना दि.6 सप्टेंबर रोजी अपंगत्वाचा दाखला देण्यात आला. खडसे हे राजकीय वलय असलेले नेते आहे. त्याना शासकीय खर्चाने संरक्षण दिले जात आहे. दि 6 सप्टेंबरपर्यंत त्यांनी अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दिली आहे. त्यामुळे त्यांचे प्रमाणपत्र हे संशयाच्या भोवऱ्यात आहे. ईडीची चौकशी टाळण्यासाठी त्यांच्याकडून वारंवार दिशभूल केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी या प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून खोटे प्रमाणपत्र दिलेले असल्यास अधिकारी व तज्ञ डॉक्टर यांच्यासह माजी मंत्री खडसेंवर कारवाई करावी अशी मागणी गजानन मालपुरे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

Previous Post

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधीक भरपाई जळगाव जिल्ह्याला मिळणार असल्याचा दावा..

Next Post

शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन….

Next Post
शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन….

शासकीय रूग्णालयात 7 रोजी पीएसए ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!