• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑटोरिक्षा चालकांना संसर्ग रोखण्यासाठी पारदर्शक पडद्यांचा उपाय

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 18, 2021
in जळगाव, शासकीय
0
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व प्रसार पूर्णपणे रोखणे अत्यावश्यक आहे. याकरीता जिल्हा प्रशासन यांचेकडून विविध मोहिमा व बंधने घालण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व ऑटोरिक्षा चालकांनी ऑटोरिक्षांमधील प्रवासी व चालक यांच्यात संपर्क होवू नये, याकरीता त्यांचे ऑटोरिक्षांमध्ये चालक केबीन व प्रवाशांना बसण्याची जागा या दरम्यान फायबर/प्लास्टीकचे अथवा इतर पारदर्शक पडद्याने विभाजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोनाचा होणारा संसर्ग टाळता येईल.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या दि. 29 एप्रिल, 2021 च्या आदेशान्वये फक्त अत्यावश्यक सेवेकरीता ऑटोरिक्षामधून कमाल 2 प्रवासी वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गावर परिणामकारकरित्या प्रभावी पध्दतीने आळा घालण्याकरीता या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी सर्व ऑटोरिक्षा चालकांची तसेच प्रवाशांची सुध्दा आहे. जिल्ह्यातील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी याप्रमाणे त्यांच्या ऑटोरिक्षामध्ये सुधारणा करुनच प्रवासी वाहतूक करावी. जे ऑटोरिक्षाधारक या सुचनांचे पालन करणार नाहीत, अशा ऑटोरिक्षाचालकांविरुध्द दि. 16 मे, 2021 पासून मोटार वाहन कायदा 1988, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता अधिनियमातंर्गत कारवाई करण्यात येईल, याची सर्व ऑटोरिक्षाचालकांनी नोंद घ्यावी असे जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून कळविले आहे.

Tags: auto rickshawcoronacorona safetyjalgaonrajmudra
Previous Post

जिल्ह्यातील खेळाडूंना पालकमंत्र्यांचा दिलासा

Next Post

शेतकऱ्यांना उत्कृष्ट बिजोत्पादनात सहभागी होण्याचे महाबीजचे आवाहन

Next Post

शेतकऱ्यांना उत्कृष्ट बिजोत्पादनात सहभागी होण्याचे महाबीजचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!