• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसे – पाटील समर्थकांमध्ये जुंपली ; महाजनांच्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये थेट धमकीची पोष्ट..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 7, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण |  गेल्या अनेक दिवसापासून मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांचे तसेच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे वाद चव्हाट्यावर आले होते यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते एकमेकावर आरोप-प्रत्यारोप आता फिरा सुरू झाल्याने राज्यभरात याची चर्चा होती. मात्र आता पुन्हा खडसे व पाटील समर्थकांमध्ये जुंपली असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सोशल मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील यांना सोशल मीडिया वरून कॉल करून धमकी दिल्याची तक्रार मुक्ताईनगर येथील पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आहे.

याबाबत वृत्त असे की, मुक्ताईनगर येथील शिवराज पाटील हे जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.  दि २ ऑक्टोबर रोजी माजी मंत्री जामनेर चे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या आयोजित पत्रकार परिषदेच्या लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान महाजन यांच्या व्हिडिओ खालील पोस्टमध्ये शिवराज पाटील यांनी मुक्ताईनगर चे आमदार आमचे असल्याचा उल्लेख केला म्हणजेच भाजपचे एकूण आमदार एकशे सात झाले का ? असा प्रतिसवाल शिवराज पाटील यांनी त्या लाइव्ह प्रक्षेपण दरम्यान पोस्ट केला होता  यावरून त्यांना त्याच पोस्टला प्रतिक्रिया म्हणून थेट धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे.

यामुळे खडसे – पाटील गटाचा राजकीय संघर्ष सुरू असताना आता व्यक्तिगत पातळीवर टिक्का-टिपणी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. या घटनेमुळे दोघांमध्ये राजकीय संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीच दोन्ही प्रमुख नेते हे महा विकास आघाडीचे घटक असताना भविष्यात खडसे – पाटील वाद महा विकास आघाडीच्या डबघाईला कारणीभूत ठरतो का ?असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

या पोस्टवर शिवराज पाटील यांनी दिलेल्या  प्रकाश गोसावी रा.मुक्ताईनगर; मितेश पाटील रा.शेमळदा;  आणि अक्षय पाटील रा.वरणगांव याने त्यांच्या मोबाईलवरून शिवराज पाटील यांना कॉल करून धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या विषयी  सुमारे ४०ते ५० अनोळखी लोकांनी शिवराज पाटील यांना सतत मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांचे नाव घेऊन जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. तरी माझे अथवा माझ्या परिवारातील सदस्यांच्या जीवाचे काही एक बरे वाईट झाल्यास वरील व्यक्ती व त्यांचे  ४०-५० समर्थक लोक जबाबदार राहतील व त्यांनाच जबाबदार धरण्यात यावे. असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. तसेच वरील लोक  हे सतत शिवराज पाटील यांच्या  घराकडून मोटर सायकलींवर ट्रिपल सीट बसून येऊन जोर-जोरात होर्न वाजवून शिवराज पाटील यांना घाबरवत असतात असे या तक्रारीत देण्यात आले आहे. या प्रकरणी प्रकाश गोसावी, मितेश पाटील, अक्षय पाटील यांच्या विरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून आपल्याला पोलीस संरक्षण देण्यात यावे असे शिवराज पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी या आशयाची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील, जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांचेकडे सुद्धा लेखी तक्रार केली आहे. नेमकं राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते या सर्व प्रकरणाची काय दखल घेतात याकडे माध्यमांसह राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.

Tags: bjp muktainagareknath khadasejalgaon jilhamaharashtra mahavikas aaghadimla chandrakant patilshivsena muktanagar
Previous Post

भुसावळ भाजपाने मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्याचा केला आनंदोत्सव साजरा..

Next Post

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची आतषबाजी

Next Post

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची आतषबाजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!