• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत विकास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 8, 2021
in जळगाव
0
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत विकास पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश…
Spread the love

जळगाव राजमुद्रादर्पण । तालुक्यातील नशिराबाद येथे माजी सरपंच विकास पाटील यांनी दि.८ शुक्रवार रोजी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत घरवापसी करत शिवसेनेत घरवापसी केली आहे. ऐन नगरपरिषदेच्या निवडणुकीआधी विकास पाटील हे समर्थकांसह शिवसेनेत दाखल झाल्याने याचा निवडणुकीतील समीकरणावर निश्‍चित परिणाम होणार आहे. पालकमंत्र्यांनी विकास पाटील आणि त्यांच्या सहकार्‍यांचे स्वागत करून नशिराबादच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, अजिंठा विश्रामगृहात नशिराबाद येथील माजी सरपंच विकास पाटील यांच्यासह इतरांचा शिवसेनेत प्रवेश झाला. यात प्रामुख्याने  माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश महाजन, शेख सत्तार, शेख मजीद, युसुफखान जमशेर खान, संदीप पाटील, सुपडू चौधरी, पराग देवरे, अहमद  शेख सत्तार,  मोईन खान युसुफखान,  भुषण माळी,  सय्यद सलीम रज्जाक अब्बास, सागर पाटील, जगदीश माळी, रितेश महाजन,  संजू माळी, दिगंबर पाटील यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते ना.  गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रवेश केला. यावेळी जय भवानी – जय शिवाजी , शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर कार्यकर्त्यांनी दनानुन सोडला.  या सर्वांना  शिवबंधन बांधून या सर्व पदाधिकार्‍यांना शिवसेनेत स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, विकास पाटील यांची आज खर्‍या अर्थाने घरवापसी झाली आहे. ते मूळचे शिवसैनिक होते. आणि दुसर्‍या पक्षात जाऊन देखील ते शिवसेनेच्याच स्टाईलने काम करत होते. त्यांच्या माध्यमातून आता शिवसेनेला बळकटी मिळाली आहे. नशिराबाद शहराला गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प मी सोडला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामांना मर्यादा असल्याने येथे नगरपरिषद अस्तित्वात आली असून या माध्यमातून विकासकामांना मोठ्या प्रमाणात गती दिली जाणार आहे. या अनुषंगाने सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असा आवाहन त्यांनी केले. तसेच ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, स्थानिक शिवसैनिकांनी जुन्या – नव्याच्या भेदाला थारा न देता एकदिलाने काम करणे आवश्यक आहे. कुणी सांगली-वांगलीवर विश्‍वास न ठेवता शिवसेनेचा विचार नेटाने पुढे न्यावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तर विकास पाटील यांनी ना. गुलाबरावजी पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून आपण घरवापसी केली आहे. नशिराबादच्या विकासासाठी भाऊंच्या मनात मोठे व्हिजन असून यानुसार शहरातील कामांना गती दिली जाणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, धोंडू जगताप, माजी सभापती नंदलाल पाटील, रमेश आप्पा पाटील, शहरप्रमुख विकास धनगर , उप तालुका प्रमुख दगडू माळी,  चंद्रकांत भोळे, असलम सर, कैलास नेरकर, विनायक धर्माधिकारी,  चेतन बरहाटे,  विजय वाणी,  बापू चौधरी,  मधुकर मिस्त्री,  प्रभाकर पैलवान, डॉ. मयूर चौधरी,  उल्हास चौधरी,  अविनाश घोडकर,  परेश माळी , नोमदास रोटे,  चंदू पाटील, यांच्यासह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Previous Post

कॉग्रेस जळगाव जिल्हाअध्यपदी प्रदीप पवार : फटाक्यांची आतषबाजी

Next Post

संजय राऊत म्हणाले, ‘अपना भी टाईम आयेगा’

Next Post
संजय राऊत म्हणाले, ‘अपना भी टाईम आयेगा’

संजय राऊत म्हणाले, ‘अपना भी टाईम आयेगा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!