• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावच्या राजकारणात “उलटी गंगा”; भाजपच्या नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा ; बंडखोरांचे यशस्वी राजकारण ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 8, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
बंडखोर नगरसेवक अपात्र प्रकरणी आता २६ ऑक्टोबरला सुनावणी
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण  |  जळगाव च्या राजकारणात उलटी गंगा वाहिल्याचे पाहायला मिळाले आहे. रोंचक  अशा एकामागून एक घटना राजकीय पटलावर घडताना दिसून येत आहे. ज्या भाजप नगरसेवकांनी पक्षादेश मानून बंडखोरानी बजविलेल्या व्हीप जुगारून महापालिका प्रभाग समिती निवडणुकी दरम्यान मतदान केले.  त्याच भाजप नगरसेवकांना बंडखोरांनी बजवलेल्या व्हीप वरून अपात्रतेच्या कार्यवाही करीता विभागीय आयुक्तांनी नोटीस बजावली असल्याची घटना घडली आहे. यामुळे पक्ष आदेश मानणाऱ्या भाजप नगरसेवकांची तूर्तास तरी राजकीय कोडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. जळगावात या घटनेमुळे राजकारणातील अशीही “उलटी गंगा” वाहत असल्याची राजकीय घटना अधोरेखीत झाली आहे.

जळगाव महापालिकेत प्रभाग समितीच्या निवडीत व्हीपचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना अपात्र करण्यात का येऊ नयेत ? यासाठी आज विभागीय आयुक्तांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. भाजपच्या फुटीर गटातर्फे गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अर्जावर निर्णय देण्यात आला यावेळी हि नोटीस भाजपच्या २७ नगरसेवकांना बजवण्यात आली आहे.

 

काय आहे प्रकरण ? 

मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षात उभी फूट पडून शिवसेनेचा भगवा महापालिकेवर फडकला होता. यात महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदी भाजपतील फुटीर गटाचे नेते कुलभूषण पाटील यांची वर्णी लागली. दरम्यान, आपल्या गटाकडे सर्वाधीक ३० नगरसेवक असून पक्षाचे सभागृहातील गटनेता हे दिलीप पोकळे असतील असे पत्र देखील या गटातर्फे देण्यात आले होते.  प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत गटनेता दिलीप पोकळे आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सर्व सदस्यांसाठी व्हीप बजावला होता. भाजपच्या २७ नगरसेवकांनी याचे उल्लंघन केले. यामुळे दिलीप पोकळे आणि कुलभूषण पाटील यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे या सर्व नगरसेवकांनी भाजपच्या व्हिपचे उल्लंघन केले असल्याने त्यांना अपात्र करावे अशा मागणीचा अर्ज करण्यात आला होता.

 

पक्ष आदेश न मानणाऱ्या फुटीर नगरसेवकांवर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी अपात्रतेची १०० टक्के कार्यवाही होणार असे सांगितले होते. मात्र अद्याप पर्यत नोटीस बजावण्या व्यतिरिक्त कोणतीही कार्यवाही बंडखोरांवर झालेली दिसून येत आहे. या संदर्भात भाजपने खंडपिटात दावा दाखल केला आहे. मात्र ठोस असे यश भाजपला मिळालेले दिसून येत नाही. मात्र भाजपचे बंडखोर मात्र आपल्या प्रत्येक राजकीय मनसुब्यात यशस्वी होताना पाहायला मिळत आहे. एकंदरीत भाजप नगरसेवकांना अपात्रतेची नोटीस म्हणजे बंडखोरांची जमेची बाजू आहे.

या अर्जावर निर्णय देतांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांना नोटीसा बजावून त्यांना अपात्र का करण्यात येऊ नये ? अशी विचारणा केली आहे. आज ही नोटीस बजावण्यात आली असून यावर संबंधीत नगरसेवकांना सात दिवसांच्या आत उत्तर देण्याचे निर्देश दिले गेले आहे. महापालिकेत लवकरच स्थायीसमिती सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. यापूर्वीच विभागीय आयुक्त गमे यांनी नोटीस बजावल्याने राजकीय तसेच कायदेशीर अडचणीचा डोगर भाजप नगरसेवकां पुढे उभा टाकला गेला आहे.

 

Tags: bandkhor bjp nagrsevakbjp nagrsevka jalgaonjalgaon mahapalikamahapalika jalgaonmaharashtra jalgaonshivsena mahapalika jalgaon
Previous Post

लखीमपूर घटनेविरोधात महाविकास आघाडीची सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक….

Next Post

वासुकमल विहार प्रकरण ; तुम्ही पण घेत आहात काय फ्लॅट ?

Next Post

वासुकमल विहार प्रकरण ; तुम्ही पण घेत आहात काय फ्लॅट ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!