• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम पूजन उत्साहात…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 16, 2021
in जळगाव
0
नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम पूजन उत्साहात…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव येथे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे विजयादशमीनिमित्त भगवान श्रीराम व भारत मातेच्या प्रतिमांचे पूजन व ध्वज पूजन करण्यात आले. यावेळी आकर्षक रांगोळी आणि फुलांनी सुशोभित केल्यामुळे महापालिका परिसर हा मंगलमय झालेला दिसून आला. विजयादशमीच्या दिवशी शुक्रवारी दि. १५ ऑक्‍टोबर रोजी महानगरपालिकेच्या इमारतीखाली श्री नेहरू चौक मित्र मंडळातर्फे विविध प्रकारच्या रांगोळ्या व फुलांनी चौक सुशोभित करण्यात आला होता. तसेच या ठिकाणी उभारलेला ध्वजस्तंभ लक्ष वेधून घेत होता. यामुळे परिसर चैतन्यमय झाला होता.  सकाळी दहा वाजता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या हस्ते ध्वजस्तंभाचे पूजन झाले.

शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. महापौर जयश्री महाजन यांनी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर यावेळी भगवान श्रीराम आणि भारत माता यांचा विजयी घोष झाला. यानंतर भगवान श्रीराम आणि भारत माता यांची आरती करण्यात आली. यावेळी महापौर जयश्री महाजन, आ. सुरेश भोळे व सर्व मान्यवरांनी उपस्थित सर्वांना विजयादशमीच्या आरोग्यमयी शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी नगरसेवक किशोर भोसले,  अमित भाटिया, बजरंग दलाचे ललित चौधरी, दीपक जोशी, रमेश तलरेजा, मनोहर नाथाणी, राजेंद्र वाणी,  रमाकांत महाराज, युवासेना पदाधिकारी पियुष गांधी,  महानगरप्रमुख विशाल वाणी, स्वप्नील परदेशी यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी आणि जळगावचा राजा नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळाचे सर्व सेवक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Previous Post

आम्हाला चित्रपटात भूमिका दया – आ. गिरीश महाजन

Next Post

तरवाडे येथे २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Next Post
तरवाडे येथे २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

तरवाडे येथे २३ वर्षीय तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!