• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक एल.झेड.कोल्हे यांना ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 16, 2021
in जळगाव
0
राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक एल.झेड.कोल्हे यांना ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । डॉ. ज्योती परब यांच्या चित्रमय रामायण पुस्तकाचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या चित्रमय रामायण पुस्तकातील प्रसंग चित्रमय स्वरुपात रेखाटन करणारे जळगाव येथील राज्य पुरस्कार प्राप्त कला शिक्षक व चित्रकार लिलाधर कोल्हे (एल.झेड.कोल्हे) यांना अखिल भारतीय कला, क्रीडा व सांस्कृतिक अकादमीच्या वतीने  बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘कलागौरव पुरस्कार-२०२१’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

मुलांना  वाचनाची गोडी लागावी या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असलेल्या लेखिका व संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका डॉ. ज्योती शंकर(राज) परब यांनी लिहिलेल्या प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांच्या संघर्षाची कथा चित्रमय रामायण या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते झाले. वाचन प्रेरणा दिन(भारतरत्न ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती) आणि दसरा याचे औचित्य साधून पुणे येथे बाबासाहेबांच्या निवासस्थानी सदर छोटेखानी प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कला शिक्षक एल.झेड कोल्हे यांनी अल्पवेळेत साकार केलेले शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रतिमा बाबासाहेबांना भेट देण्यात आली.हुबेहुब व बोलकी असलेली प्रतिमा पाहुन बाबासाहेबांनी एल.झेड.कोल्हे यांचे कौतुक केले. आपल्या आशिर्वादपर शुभेच्छा देताना सांगितले की  डॉ. ज्योती परब यांनी लिहिलेले पुस्तक हे अबालवृद्धांना आवडेल. विशेषत: यामध्ये लिलाधर कोल्हे यांनी काढलेल्या आकर्षक रंगीत चित्रांमुळे मुलांना कथा आकलन करणे सोपे जाईल असे ही सांगितले.

पुस्तक प्रकाशन समारंभासाठी साहित्य गौरव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मधुसूदन घाणेकर, भावकवी व महाकवी कालिदास संस्थेचे संस्थापक वि. ग. सातपुते तथा आप्पा, ज्येष्ठ कवियत्री मंदाताई नाईक, साहित्यिका उर्मिलाताई कराड ,समाजसेवक  दिवाकर घोटीकर,पत्रकार हेमंत नेहेते, हिंदीचे गाढे अभ्यासक व साहित्यिक प्रा. महेंद्रदास ठाकूर, डॉ राज परब,प्रा.योगेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

पर्यावरण पंधरवडा निमित्त वृक्षारोपण करून जिल्हा महानगरतर्फे केले सीमोलंघन…

Next Post

जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशीचा ट्रक उलटुन १ मजुर जागीच ठार; तर ८ जखमी

Next Post
जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशीचा ट्रक उलटुन १ मजुर जागीच ठार; तर ८ जखमी

जामनेर-जळगाव रस्त्यावर कपाशीचा ट्रक उलटुन १ मजुर जागीच ठार; तर ८ जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!