• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्ससोबत बैठक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 18, 2021
in जळगाव
0
राज्यातील निर्बंध आणखी शिथिल होणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्कफोर्ससोबत बैठक
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । राज्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने दिवाळीच्या तोंडावर निर्बंध आणखी शिथिल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज टास्कफोर्ससोबत बैठक होणार. यात सर्व प्रकारची दुकाने, उपाहारगृहे, मॉलच्या वेळमर्यादेत वाढ करण्यात येणार असून, याबाबतचा आदेश एक-दोन दिवसांत प्रसृत करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.

कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे गेल्या काही दिवसात शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल्स, नाट्यगृह खुली करण्यात आलीत. बंद सभागृहातील 200 लोकांच्याच उपस्थितीची मर्यादाही हटवण्यात आलीय. त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवासाचीही परवानगी द्या अशी मागणी होतेय आणि त्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जातेय. फक्त लोकलच नाही तर हॉटेल्स, मॉलमध्येही एक लस घेतलेल्यांना प्रवेश मिळण्याची चिन्हं आहेत. ह्या संदर्भातच मुख्यमंत्री टास्कफोर्सच्या तज्ञांची मतं जाणून घेतील आणि त्यानंतर निर्णय होईल.

 

Previous Post

जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका…

Next Post

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांवर निशाणा

Next Post
‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांवर निशाणा

‘दिवसाढवळ्या स्वप्न बघायला आपल्या देशात कुणालाही बंदी नाही’, अतुल भातखळकरांचा शरद पवारांवर निशाणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!