• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्हयातील धरणात पाण्याच्या पातळीत वाढ; वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 18, 2021
in जळगाव
0
जिल्हयातील धरणात पाण्याच्या पातळीत वाढ; वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात जोरदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे. त्यामुळे अनेक धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली असली तरी सध्या वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणारे वाघूर धरण शंभर टक्के भरले आहे. आज सोमवारी सकाळी वाघूर धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून २७०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. वाघूर १०० टक्के भरल्याने जळगावकरांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. बोरी धरणाची पाणी पातळी २६७.१० मीटरवर गेली आहे. त्यामुळे बोरी धरणाचे रात्री २ वाजेला ३ दरवाजे ०.१० मीटरने उघडण्यात आले. त्यामधून ९०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु आहे.

हतनूर धरण १०० टक्के भरलं असून धरणाचे आज सकाळी ६ वाजता ८ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून ६४,९८० क्यूसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला आहे. पावसाळ्याच्या सुरवातीपासून हतनूरमधून सुरु असलेला विसर्ग अद्यापही सुरु आहे.

मन्याड धरण देखील ओव्हर फ्लो झालं आहे. ओव्हर फ्लोमुळे धरणातून ४१७.५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर मोर मध्यम प्रकल्पाची जलपातळी ३२५.६० मी इतकी असून धरणातील एकूण पाणीसाठा ९.५०५ दलघमी इतके आहे. मोर मध्यम १०० टक्के भरले असून धरणाचे २ दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून १७३.७४ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

मंगरूळ मध्यम प्रकल्प देखील १०० टक्के भरले असून धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे प्रकल्पातून १३८.०८ क्युसेक्स पाणी वाहत आहे. मंगरूळ प्रकल्पाची जलपातळी ३३१.६० मी.इतका असून प्रकल्पात एकूण पाणीसाठा 8.982 दलघमी इतका आहे. आजचा उपयुक्तसाठा – 6.407 दलघमी एवढा आहे.

गिरणा धरणाचे आज सकाळी २ दरवाजे उघण्यात आले आहे. धरणातून २४७६ क्यूसेस इतक्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गिरणा धरणाची वॉटर लेव्हल ३९८.०७० मीटर इतके असून धरण १०० टक्के भरले आहे.  तर बहुळा मध्यम प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सें.मी. ने उघडण्यात आले असून धरणातून ३०९२ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. बहुळा प्रकल्पाची वॉटर लेव्हल २५१.७० मी इतकी आहे. हिवरा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून १९७ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे. तर अग्नवती मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले असून धरणामधून २५ क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

दरम्यान, यंदा सुरवातीला पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरवली असल्याने धरणांची जलपातळी अधिकच खालावली होती. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु असलेल्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश धरण पूर्ण भरली असून धरणांतून पाण्याचा विसर्ग होत आहे. मध्यंतरी झालेल्या दमदार आणि आता परतीच्या पावसाने जिल्हावासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न किमान वर्षभरासाठी तरी मिटला आहे.

 

 

Previous Post

स्टीकर नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलिसांची कारवाई…

Next Post

अन.. सारे झाले अवाक्… ; माजी खा. ए. टी पाटलांचे सहकारात जोरदार कम बॅक..

Next Post

अन.. सारे झाले अवाक्… ; माजी खा. ए. टी पाटलांचे सहकारात जोरदार कम बॅक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!