• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खा. उन्मेश पाटील यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसोबत चर्चा….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 22, 2021
in जळगाव
0
खा. उन्मेश पाटील यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसोबत चर्चा….
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव विमानतळावरून लवकरच पुणे इंदोर विमानसेवा सुरू करण्यासह अजिंठा ते जळगाव हेलिकॉप्टर सेवा, विमानतळावर मंजूर असलेल्या हेलिकॉप्टर व विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला गती त्याचप्रमाणे शेतमाल,नाशवंत व किमती मालाची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी कार्गो लॉजिस्टिकची निर्मिती करणे, मोठ्या आकाराची विमाने थांबण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवणे या विविध विषयांवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे व इंदोर प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी दिल्ली येथून दिली आहे. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली.

जळगाव विमानतळ येथे मंजूर झालेले पायलट ट्रेनिंग सेंटर व हेलिक्रॉप्टर ट्रेनिंग सेंटर बाबत  कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जळगाव विमानतळावर रात्री विमान उतरण्याची व्यवस्था कार्यान्वित झाल्याने  प्रसंगी मोठ्या आकाराची विमाने जळगाव विमानतळावर उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्यात यावी.अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली होती.  मंत्रीमहोदयांनी यावर तातडीने कार्यवाहीचे संकेत दिले. जळगाव विमानतळावर वस्तु साठवण्यासाठी व्यवस्था असल्याने कार्गो लॉजिस्टिक सेवा सुरू केल्यास शेतमाल, नाशवंत व किंमती वस्तूंची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी येथून सुविधा उपलब्ध व्हावी. यांचा मोठा लाभ स्थानिक उद्योजकांना होईल.तसेच महत्वाचा जळगाव ते पुणे व जळगाव ते इंदोर प्रवासी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी येत्या दहा दिवसात गती देऊन संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आदेश दिले.

अजिंठा जळगाव हेलिकॉप्टर सेवेबाबत केंद्र सरकार आग्रही केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याशी मराठीत संवाद साधत जळगाव हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. आणि ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालय आग्रही आहे. त्यामूळे जळगाव विमानतळ हे लवकरच देशाच्या नकाशावर अजिंठा हेलीपोर्ट सेवेमुळे चर्चेत येईल. अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली.

Tags: kha. unmesh patil
Previous Post

शेतकर्‍यांना मिळणार दिलासा; केळी उत्पादकांसह फळबागायतदार शेतकर्‍यांना विम्याची रक्कम मंजूर

Next Post

राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात; दोन जण ठार

Next Post
राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात; दोन जण ठार

राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाण पुलाजवळ अपघात; दोन जण ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!