• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“लाभार्थी सन्मान दिवस” निमित्त आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थी यांचा सन्मान’’.

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 26, 2021
in जळगाव
0
“लाभार्थी सन्मान दिवस” निमित्त आ.गिरीष महाजन यांच्या हस्ते लाभार्थी यांचा सन्मान’’.
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस “सेवा समर्पण” सप्ताह म्हणून संपूर्ण देशभरात साजरा केला गेला. सेवा समर्पण सप्ताह अंतर्गत देशभरात विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले. तसेच केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजना ची माहिती, त्या योजनांचा लाभ कश्या पद्धतीने घेता येईल. त्यासाठी लागणारे कागदपत्र या बाबत संपूर्ण माहिती लाभार्थी यांच्या पर्यन्त पोहचविण्याचे कार्य ह्या सप्ताह अंतर्गत करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील आरोग्य सेवा व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जी. एम. फॉऊंडेशन चा यात मोलाचा वाटा आहे.

जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी लसीकरण मोहीम व सामाजिक उपक्रम जी. एम. फॉऊंडेशन च्या माध्यमातून राबविले गेले. त्यात केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना “पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचा”  चा लाभ मिळवून देण्यासाठी जी. एम. फॉऊंडेशन च्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते.  योजने अंतर्गत लाभ मिळविण्यासाठी साठी २०१३ लाभार्थी जळगाव शहरातून आता पर्यन्त पात्र झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्ष १७६८ लोकांना त्याचा लाभ मिळाला आहे, तसेच जामनेर शहरातून ३१३ लाभार्थी पात्र झाले आहेत तर प्रत्यक्ष २६१ लोकांना योजने अंतर्गत लाभ मिळाला आहे. पाचोरा शहरातून आतापर्यंत  ३२२ लाभार्थी पात्र करण्यात आले आहेत, तर १५८ लोकांनी प्रत्यक्ष लाभ घेतला आहे. जी. एम. फाऊंडेशन च्या माध्यमातून जळगाव, जामनेर, पाचोरा या ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात जळगाव शहराची जबाबदारी होनाजी चव्हाण, जामनेर शहराची जबाबदारी आतिष झालटे व पाचोरा शहराची जबाबदारी अमोल शिंदे यांना सोपविण्यात आली. पंतप्रधान स्वनिधी आत्मनिर्भर योजनेचा लाभ घेतलेल्या साठी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविलेल्या सेवा समर्पण सप्ताहच्या निमित्ताने “लाभार्थी सन्मान दिवस” राबविला जात आहे. त्या अंतर्गत लाभ मिळालेल्या लाभार्थी चा पत्र  देवून सन्मान करण्यात येत आहे. आ. गिरीष महाजन यांच्या हस्ते जळगाव येथील जी. एम. फौंडेशन येथे प्रातनिधिक स्वरूपात लाभार्थी श्री. हरिष घनश्याम जैसवाल व श्री. गणेश विष्णु नाथजोगी यांचा सन्मान करन्यात आला.

याप्रसंगी महानगर जिल्हाध्यश श्री. दिपक सूर्यवंशी. जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख. नगराध्यक्ष श्री. करणदादा  पवार, नगरसेवक मुकुंदा सोनवणे, माजी नगरसेवक किशोर चौधरी, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, सुधीर पाटील, आरोग्यदूत अरविंद देशमुख, पितांबर भावसार, अतुलसिंह हाडा, विशाल महाजन, पराग महाशब्दे व इतर उपस्थित होते.

Tags: girish mahajan
Previous Post

कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदानासाठी तक्रार निवारण जिल्हास्तरीय समिती गठित

Next Post

पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल

पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!