• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 26, 2021
in राजकीय
0
वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात
Spread the love

दादरा नगर-हवेली  राजमुद्रा दर्पण । खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

आपलं भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवलं. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली हे पहिलं काम मोदींनी केलं. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरं दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरं दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षात दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत. ते 7 वर्षात मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.

कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उद्या दादरा नगर-हवेलीला जाणार आहेत. तशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दादरा नगर-हवेलीत प्रचारासाठी येतील अशी माहिती राऊत यांनी यापूर्वी दिली होती. मात्र, अद्याप उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

खासदार संजय राऊत 16 ऑक्टोबर रोजी दादरा नगर-हवेली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले सिल्वासा आणि दादरा नगर हवेली कित्येक वर्षानंनतर स्वतंत्र झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असं म्हणायला लागले आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

 

Tags: devendra fadanvis
Previous Post

पहूर येथे रस्ता आडवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवारांचा लवकरच पदग्रहन सोहळा…

Next Post
काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवारांचा लवकरच पदग्रहन सोहळा…

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप पवारांचा लवकरच पदग्रहन सोहळा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!