(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) रामानंद पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा घडल्यापासून फरार असलेला आरोपी गौतम मनोहर लहाने हा नाशिक येथील राहत्या घरी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. ही माहिती मिळताच त्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. गौतम लहाने हा गुन्हा घडल्यापासून अद्याप फरार होता पोलीस त्याच्या मागावर होते.
नाशिक येथील राधा स्मृती अपार्टमेंट, सम्राट स्वीट जवळ, पांडव नगरी येथील रहिवासी गौतम लहाने याच्यावर रामानंद पोलीस स्टेशन मध्ये भाग ५ गु.र.न १६३/२०१८ भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६५ हा गुन्हा दाखल होता. नाशिक येथील इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये सदर आरोपीची नोंद करून त्याला वैद्यकीय तपासणी अंती रामानंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र पाटील, अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, रावसाहेब पाटील या पथकाने ही कारवाई केली आहे.


