• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी; त्यांना लाज वाटायला हवी, किरीट सोमय्यांचा घणाघात

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in राजकीय
0
नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंची बदनामी; त्यांना लाज वाटायला हवी, किरीट सोमय्यांचा घणाघात
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. भाजप नेत्यांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांवर जोरदार टीका केली जाते आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावरुन नवाब मलिक समीर वानखेडे यांच्या कुटुबियांची माहिती काढत आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नीशी माझं बोलणं झालं आहे. ते आणि त्यांचे सासरे मला भेटायला येणार असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे. एका अधिकाऱ्याची जात काढली जाते, त्याचा बायकोची इज्जत काढली जाते, अशा शब्दात सोमय्या यांनी ठाकरे आणि पवारांवर निशाणा साधलाय. तसंच महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे दाबण्यासाठीच समीर वानखेडे प्रकरणाची चर्चा सुरु आहे.

जात काढली जाते, बाप काढला जातो, हे साफ चुकीचं आहे. ठाकरे सरकार चुकीचं वागतंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना हे शोभत नाही. मलिक ज्या प्रकारे चिखलफेक करत आहेत, ते साफ चुकीचं आहे. मलिकांनी कोर्टात जावं. कोर्ट काय तो निर्णय घेईल. दिशाभूल का करताय? तुमचे घोटाळे बाहेर काढले त्यामुळे लक्ष विचलित करण्यासाठी समीर वानखेडेंना टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

गेली 12 दिवस झाले समीर वानखेडे दलित की मुस्लिम हा वाद सुरु आहे. अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरु होत्या. त्यांना वाचवण्यासाठीच हे प्रकरण सुरु करण्यात आलं. ही सगळी ठाकरे सरकारची बदमाशी सुरु आहे. शरद पवार यांनी स्पष्ट केलं की अजित पवारांकडे चिल्लर सापडली. पण बिल्डरकडे 180 कोटी सापडले, त्याच बिल्डरने अजित पवारांना 100 कोटी रुपये दिले आहेत. अजित पवारांचे घोटाळे सिद्ध झाले आहेत. अजित पवार सिंचन घोटाळ्यात आरोपी आहेत. चार्जशीटमध्ये त्यांचं नाव आहे. त्यावरील कारवाई या सरकारने थांबवली आहे, अशी टीका सोमय्या यांनी केलीय.

सिंचन घोटाळ्याची चर्चा, स्वतःचे घोटाळे दाबण्यासाठी लक्ष विचलीत करण्याचं काम सुरु आहे. त्यात जर काही घोटाळा असेल तर मग कारवाई करा. नारायण राणेंचा बंगला अनधिकृत असल्याचं सांगता मग तुम्ही कारवाई का करत नाही. संजय राऊथ यांचं पत्र मी रद्दीत टाकलं आहे. मी त्या पत्राला दमडीचीही किंमत देत नाही. 31 डिसेंबरपर्यंत अलीबाबा आणि चाळीस चोरांचे घोटाळे काढणार. उद्धव ठाकरे यांनी कितीही ट्रिक काढल्या तरी घोटाळेबाज सुटणार नाहीत, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

 

Tags: kirit somaiya
Previous Post

धक्कादायक; जळगाव नागरी सहकारी पतपेढीच्या सात संचालकांवर अखेर कारवाई….

Next Post

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका…

Next Post
इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका…

इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्र सरकारवर टीका...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!