• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आर्यन खानच्या जामीन अर्जावर होणार पुन्हा सुनावणी आज तासाभरात उच्च न्यायालय देऊ शकते निकाल…..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 28, 2021
in Uncategorized
0
आर्यन खानच्या जामीन अर्जावर होणार पुन्हा सुनावणी आज तासाभरात उच्च न्यायालय देऊ शकते निकाल…..
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । आर्यनच्या जामीनावर सुनावणीला सुरुवात युक्तिवाद तासाभरात पूर्ण झाल्यास उच्च न्यायालय आजच देऊ शकते निकाल क्रूझ ड्रग्ज प्रकरणी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात असलेल्या आर्यन खानच्या जामीनावर आज निर्णय येऊ शकतो. मुंबई उच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल. आरोपींच्या जामीनाला विरोध दर्शवत सरकारी वकील अनिल सिंग एनसीबीच्या वतीने आज युक्तिवाद करतील.

एसीजी अनिल सिंग, वकील श्रीराम शिरसत आणि एनसीबीची टीम कोर्टात दाखल झाली आहे. बुधवारी न्यायालयाने म्हटले होते की, जर सरकारी वकिलांनी तासाभरात युक्तिवाद पूर्ण केल्यास गुरुवारीच या प्रकरणावर निर्णय देता येईल. आज सुनावणीचा हा तिसरा दिवस आहे. आर्यन खानची बाजू मांडणारे  वकील मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला की, अटक वॉरंटमध्ये वास्तविक आणि योग्य कारणांचा उल्लेख नसल्यामुळे अटक घटनात्मक तरतुदींचे थेट उल्लंघन आहे.

त्यानंतर आज तपास यंत्रणा आणि सरकारी पक्ष या नात्याने एनसीबी आपली बाजू न्यायालयात मांडणार आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नेमके काय होते. हे पाहणे अति महत्वाचे ठरणार आहे.  २ऑक्टोबरला एनसीबीने मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण

८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना २६ऑक्टोबर रोजी दोन आरोपींना मनिष राजगरिया आणि आविन साहू जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर आज पुन्हा सुनावणी होणार आहे.

Previous Post

समीर वानखेडेंच्या पत्नी क्रांती रेडकरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र; नेमकं काय लिहिले आहे पत्रात?

Next Post

NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी….

Next Post
NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी….

NEET परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास सुप्रीम कोर्टाकडून परवानगी....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!