• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आयुष’ असोसिएशनतर्फे जळगाव येथे उद्या खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Kamlesh Devre by Kamlesh Devre
October 30, 2021
in जळगाव
0
‘आयुष’ असोसिएशनतर्फे जळगाव येथे उद्या खान्देश गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनतर्फे येत्या 31 ऑक्टोबर, रविवार रोजी ” खान्देश गौरव पुरस्कार ” सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात शासनाने ठरवून दिलेले सर्व प्रकारचे नियम पाळले जातील.

‘आयुष’ ही संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे. आयुर्वेदिक, अँक्यूपंक्चर, युनानी, योगा आणि नॅचरोपॅथी, सिद्ध, होमिओपॅथी या सात पॅथी एकाच छताखाली या संघटनेने यशस्वीरीत्या एकत्र आणल्या आहेत. ही संघटना केंद्र सरकार सोबतही कार्य करीत आहे. ही बाब आनंददायी आहे. या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि सुवर्ण पुनर्वसू आयुर्वेद, जळगावतर्फे या विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यातील काही डॉक्टरांचे कौतुक करण्यासाठी खान्देश गौरव पुरस्कार सोहळा असा हा देखणा समारंभ जळगाव  रेल्वे स्टेशन जवळील सुप्रसिद्ध हॉटेल सिल्व्हर पॅलेसमध्ये सकाळी १०  ते दुपारी ४ या वेळेत संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार उन्मेष पाटील, आमदार राजुमामा भोळे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सतीश कराळे, ( नागपूर ) उपाध्यक्ष डॉ.नितीन पाटील,(बुलडाणा ) जळगाव महापालिकेचे महापौर जयश्री महाजन, आयुक्त डॉ.सतीश कुळकर्णी, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

या कार्यक्रमात डॉक्टरांचा विशेष सन्मान केला जाणार आहे, तसेच वैद्यकीय क्षेत्राबद्दल काही स्लाईड शो, व्याख्यान आणि मार्गदर्शनही केले जाणार आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून सन्मानार्थी डॉक्टर्स आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयुर्वेद विभागाचे उपाध्यक्ष डॉ.राकेश झोपे, आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते तुषार वाघुळदे यांनी केले आहे.

 

Tags: aayush association
Previous Post

आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ; जाणून घ्या कारणे…

Next Post

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंबीय कोरोनामुक्त..

Next Post
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंबीय  कोरोनामुक्त..

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटूंबीय कोरोनामुक्त..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!