• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचा दणदणीत विजय; अन्य राज्यातही निवडणूक लढवणार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 3, 2021
in राजकीय
0
दादरा नगर-हवेलीतून शिवसेनेचा दणदणीत विजय; अन्य राज्यातही निवडणूक लढवणार…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत दिवंगत मोहन डेलकर यांच्या पत्नी शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांनी दणदणीत विजय मिळवलाय. कलाबेन यांना एकूण 1 लाख 12 हजार 741 मते मिळाली. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार महेश गावीत यांना 63 हजार 382 मते मिळाली. डेलकर यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 47 हजार 447 मतांनी पराभव केलाय. या विजयाच्या निमित्तानं शिवसेनेनं राज्याबाहेर पहिल्यांदाच निवडणूक जिंकली आहे. या विजयामुळे शिवसेनेचं मनोबल वाढलेल आहे.

पक्ष संघटना वाढीपेक्षा न्याय मिळवण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. अन्याया विरोधातील हा लढा होता. आता शिवसेना इतर राज्यातही निवडणूक लढणार आहे. आम्हाला विजयाची अपेक्षा आहे, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडलीय. केंद्रीय नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता. मुख्यमंत्री वेगवेगळ्या सर्व्हेत टॉप फाईव्हमध्ये येत असतात. मुख्यमंत्री सर्व मित्र पक्ष आणि प्रशासनाला सोबत घेऊन काम करत आहेत, त्यामुळे याचं श्रेय सर्वांचं असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले.

कलाबेन यांचे पती मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. मुंबईतील सी ग्रीन हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, नंतर सुसाईड नोटमध्ये दादरा नगर हवेलीतील प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचं नाव आलं होतं. पटेल यांच्या दबावामुळेच आत्महत्या करत असल्याचं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे कलाबेन डेलकर यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी मुलासह शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर शिवसेनेने कलाबेन यांना पोटनिवडणुकीचं तिकीटही दिलं होतं.

 

 

Tags: aaditya thakre
Previous Post

हृदयविकाराची भिती: हृदयरोग उपचार घेण्यासाठी रुग्णालयात नागरिकांची गर्दी…

Next Post

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल

Next Post
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करताच भाजपने राज्य सरकारवर हल्लाबोल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!