• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसे आज ईडी कार्यालयात हजर…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 5, 2021
in Uncategorized
0
भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी मंदाकिनी खडसे आज ईडी कार्यालयात हजर…
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात सध्या माजी महसूल मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची देखील ईडीकडून चौकशी सुरू आहे. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीसाठी आज ईडी कार्यालयात पोहोचल्या आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात मंदाकिनी यांचा देखील आरोपी म्हणून समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरीमध्ये जमीन घोटाळा केल्याचे आरोप करण्यात आले होते. आरोप झाल्यानंतर खडसे यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. चौकशी निपक्षपातीपणे व्हावी म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे खडसे यांनी त्यावेळी सांगितले होते.

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला गेला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे. हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहण केला होता, परंतु उकानी यांना नुकसानभरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसानभरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला जातो. पंधरवड्यातच उकानी यांनी खडसे यांच्या नातलगांना भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं. याप्रकणी आता इकनाथ खडसे यांच्यासह त्यांची पत्नी आणि परिवाराची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

 

Tags: eknath khadasemandagini khadase
Previous Post

लातुर जिल्ह्यात बससेवा ठप्पच; ५ बसेस सुरू

Next Post

दिवाळी सणाच्या काळात चोरट्यांचा धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास…

Next Post
दिवाळी सणाच्या काळात चोरट्यांचा धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास…

दिवाळी सणाच्या काळात चोरट्यांचा धुमाकूळ; दागिन्यांसह रोकड लंपास...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!