• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अरुणाचलमधून चीन आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका; राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला….

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 8, 2021
in राजकीय
0
टणाटणा उड्या मारणाऱ्यांना बाथरूममध्ये तोंड लपवून बसावे लागेल; दिवाळीनंतर स्फोट होतील, संजय राऊतांचा इशारा
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील सरकार उखडून फेकण्याचं आवाहन केलं आहे. नड्डा यांच्या या आव्हानावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. नड्डा यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचं सरकार उखडून फेका. पण महाराष्ट्रातील सरकार उखडण्याची भाषा करण्याआधी त्यांनी अरुणाचल प्रदेशात चीनने घुसखोरी करून गावंच्या गावं वसली आहेत. ती आधी उखडून फेकावीत. जम्मू -काश्मीरमध्ये अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. दहशत निर्माण झाली आहे. अतिरेक्यांचे अड्डे निर्माण झाले आहेत. उखडायचंच असेल तर अरुणाचल प्रदेशातून चीन आणि जम्मू-काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून फेका, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.

जेपी नड्डा यांचं विधान म्हणजे भाजपचं वैफल्य असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रात प्रयत्न करूनही भाजपला आघाडीचा बालही बाका करता आला नाही. इतकं मोठं राज्य, केंद्रीय सत्ता, संपूर्ण केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून दहशत, दबाव आणि पैसा याचा वापर करूनही सरकार पडत नसेल तर वैफल्य येणं हे स्वाभाविक आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

राजकारणात लोकशाहीत एखादं सरकार लोकशाही मार्गाने हटविण्याचा अधिकार दुसऱ्या पक्षाला आहे. पण उखडण्याची भाषा करत असाल तर सीमेवर जी लोकं घुसली आहेत आणि गावंच्या गावं बसवली आहेत, चीनने त्यांना उखडण्यासाठी काही करता येत असेल तर देश त्याविषयी समजून घ्यायला उत्सुक आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी अरुणाचलमधून चीनला आणि काश्मीरमधून अतिरेक्यांना उखडून झालं की मग भाजपने पूर्णपणे महाराष्ट्राकडे वळावं आणि राजकीय उखडबाजी जी काही आहे जरूर करावी, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

 

Tags: sanjay raut
Previous Post

रस्त्यांच्या  कामांनी साधला जातोय नशिराबादाचा सर्वांगीण विकास – ना. गुलाबराव पाटील

Next Post

समीर वानखेडेंच्या पत्नीनंतर यांच्या मेहुणीवर नवाब मलिक यांचा गंभीर आरोप…

Next Post
समीर वानखेडेंच्या पत्नीनंतर यांच्या मेहुणीवर नवाब मलिक यांचा गंभीर आरोप…

समीर वानखेडेंच्या पत्नीनंतर यांच्या मेहुणीवर नवाब मलिक यांचा गंभीर आरोप...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!