• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी विराज कावडीया यांची निवड…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 9, 2021
in जळगाव
0
युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदी विराज कावडीया यांची निवड…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । जळगाव शहरातील युवासेनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सहसचिव पदावर विराज अशोक कावडीया यांची  निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, युवासेना प्रमुख राज्याचे पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टचार मंत्री मा.श्री.आदित्यसाहेब ठाकरे आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ही निवड जाहीर केली आहे.

विराज कावडीया हे वयाच्या १६व्या वर्षांपासून म्हणजेच विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक कार्यात सक्रिय आहे. युवाशक्ती फाउंडेशनची सन २००८ साली स्थापना करीत त्यांनी आपल्या कामाची सुरुवात केली. विराज कावडीया यांना २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नागरिकांचे व विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत असताना, त्यांची धडाडी व संघटन कौशल्य पाहून त्यांना शिवसेनेचे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन यांनी २०१८ साली जळगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक लढण्यासाठी सर्वात कमी वयाचा व युवा उमेदवार म्हणून शिवसेनेचे तिकीट दिले. थोड्याश्या मतांनी त्यांचा पराभव झाला. या नंतर सुद्धा कावडीया हे सतत शिवसेनेच्या वाढीसाठी व नागरिकांच्या हितासाठी शहरात अग्रेसर राहून कार्य करीत होते. याचीच दखल घेत त्यांना अलीकडेच जळगाव शहर महानगरपालिकेत शिवसेनेच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक पद जाहीर करण्यात आले असून लवकरच याची अधिकृत प्रक्रिया येणाऱ्या महासभेत पूर्ण होणार आहे. या सर्व सक्रिय व सकारत्मक कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांना युवासेनेच्या राज्यस्तरावर सहसचिव म्हणून महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युवासेनेच्या स्थापने पासून प्रथमच जळगाव जिल्ह्याला, युवासेनेच्या राज्य कार्यकारणीत पद प्रदान करण्यात आले आहे.

शिवसेनेचे संघटन मजबूत करणारा आणि सामान्यांना शिवसेनेशी जोडणारा तरुण, धडाडीचा कार्यकर्ता म्हणून कावडीया ह्यांची ओळख आहे. या नियुक्तीचे अभिनंदन माजी मंत्री सुरेश दादा जैन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, संपर्क प्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेना विस्तारक कुणाल दराडे, अजिंक्य चुंभळे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख हर्षल माने, महानगरप्रमुख शरद तायडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख महानंदा पाटील, युवासेना विस्तारक किशोर भोसले, युवासेना युवती विस्तारक डॉक्टर प्रियांका पाटील, युवासेना जिल्हा युवाधिकारी शिवराजजी पाटील व सर्व शिवसेना आमदार व पदाधिकाऱ्याने यांनी केले आहे.

 

Tags: jalgaonshivsenaudhav thakreviraj kavadiyayuvasena
Previous Post

अजिंठा रेस्ट हाऊस मध्ये झालेल्या कृत्याची चौकशी करा : राष्ट्रवादीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

Next Post

शरद पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला; भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा?

Next Post
शरद पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला; भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा?

शरद पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला; भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!