• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधीत मुस्लीमसह सर्वधर्मिय समुदायाचा निलेश राणेंच्या विरोधात उद्रेक

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 11, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याचा जोरदार आंदोलनाने निषेध

पाळधी / ता. धरणगाव, राजमुद्रा दर्पण | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या कव्वाली गायनावर अतिशय खालच्या स्तरावरून टीका करत भाजप नेते निलेश राणे यांनी कव्वालीसह पालकमंत्र्यांचा अपमान केल्याबद्दल येथील मुस्लीम समुदायातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आज शहरातून मोर्चा काढून राणेंच्या प्रतिमेला चपला – जोड्यांचा मार देऊन त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी जोरदार घोषणबाजीने परिसर दणाणून निघाला होता.

भाजप नेते निलेश राणे यांनी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यावर अलीकडेच अतिशय खालच्या स्तरावरून टीका केली होती. ना. गुलाबरावजी पाटील यांनी पाळधी येथील कार्यक्रमात कव्वाली गायन केल्यामुळे ही टीका करण्यात आली होती. याचा ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. याचीच तीव्र प्रतिक्रिया पाळधी येथे देखील उमटली.

पाळधी येथे माजी पंचायत समिती सभापती व चळवळीचे कार्यकर्ते मुकुंदराव नन्नवरे यांच्या नेतृत्वाखाली मुस्लीम समुदायाय सह सर्वधर्मिय हजारो नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून निलेश राणेंच्या विरोधात घोषणाबाजी केली. ग्रामपंचायत कार्यालयापासून शहरातून मोर्चा काढण्यात आला. यानंतर राणेंच्या प्रतिमेला चपला-जोड्यांचा प्रसाद देऊन त्यांना निषेध करण्यात आला.

याप्रसंगी या निषेध आंदोलनात सहभागी झालेल्यांनी निलेश राणे यांच्यावर टीका केली. ना. गुलाबराव पाटील हे सर्वसमावेशक व्यक्तीमत्व असून त्यांनी मुस्लीम समुदायाबाबत नेहमी न्यायाची भूमिका घेतली आहे. तर कव्वाली हे मुस्लीम धर्मियांसाठी पवित्र मानली जात असून अनेक महत्वाच्या प्रसंगांमध्ये कव्वालीचे गायन करण्यात येते. मात्र निलेश राणे यांच्या मनात मुस्लीम समुदाय आणि ना. गुलाबरावजी पाटील यांच्याबाबत मळमळ असल्यामुळे त्यांनी घृणास्पद टीका केली असल्याचा आरोप याप्रसंगी आंदोलकांनी दिला. राणेंनी आपल्या जीभला आवर घातला नाही तर मुस्लीम समुदाय अजून तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील याप्रसंगी देण्यात आला.

या निषेध आंदोलनात माजी पंचायत समिती सभापती मुकुंदराव नन्नवरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील , सरपंच प्रकाश पाटील,  माजी सरपंच हाजी सुलतान पठाण , हाजी फिरोज खान,  हाजी यासीन पठाण, दानिश ,  माजी सरपंच अरुण पाटील,  युवा सेनेचे तालुकाप्रमुख पिंटू कोळी , नारायण आप्पा सोनवणे,  उद्योगपती दिलीपबापू पाटील,  पाळधी खुर्दचे सरपंच शरद कोळी , प्रशांत झंवर, माजी सरपंच अलीमभैया देशमुख, पप्पू शिंदे, धर्मेंद्र कुंभार, माजी सरपंच सोपान पाटील, किरण पाटील,सुरेश पाटील, बंडू नारखेडे, विभाग प्रमुख गोकुळ लंके, गोकूळ नाना पाटील, माजी सरपंच अलीम देशमुख, आत्मा तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील, संगोयोचे  सदस्य संजय माळी, फुलपाट सरपंच हरिभाऊ पाटील, तुषार मोरे, सुनील भोई, सचिन माळी, सचिन माळी, शेख कालू, शेख शाकिर आदींसह अन्य मान्यवर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.

Tags: bjpgulabao patiljalgaonjalgaon shivsenamaharashtranilesh rane
Previous Post

जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये भगदाड ; भाजपमध्ये यांनी केला प्रवेश…

Next Post

जामनेर राष्ट्रवादीकडुन देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन..

Next Post

जामनेर राष्ट्रवादीकडुन देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!