• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 12, 2021
in राजकीय
0
नवाब मलिकांचा इशारा ‘भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार’
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण। नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. पुण्यात एकूण 7 ठिकाणी ईडीने छापे टाकल्याचे वृत्त होते. दरम्यान नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत आज त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. परंतु  वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाहीत. जी छापेमारी सुरू आहे ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट वर आहे. वक्फ बोर्डाचे काम पारदर्शीपणे सुरू असून, अफवा पसरवणे बंद करा असे मलिक यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी ‘चोरोंने है ललकारा, मिलेगा जवाब करारा’ म्हणत मलिक यांनी भाजपाला देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, कालपासून वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडल्याच्या अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र  वक्फ बोर्डाच्या कुठल्याही कार्यालयावर छापे पडले नाहीत. अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत. मी ईडीला कुठल्याही चौकशीत सहकार्य करायला तयार आहे. याउलट भाजपाच्याच एका नेत्याने मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आम्ही भाजपाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

 

Tags: navab malik
Previous Post

पत्नीला जीवे मारल्याप्रकरणी पती दोषी, जन्मठेपेची शिक्षा..

Next Post

बालगंधर्व चौकात कंगना रनौत विरोधात आंदोलन..

Next Post
बालगंधर्व चौकात कंगना रनौत विरोधात आंदोलन..

बालगंधर्व चौकात कंगना रनौत विरोधात आंदोलन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!