जळगाव राजमुद्रा दर्पण । अमळनेर आगारात व्यवस्थापकांनी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. तरीही कामगार न डगमगता आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. दिनांक 13 रोजी २२ कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपले आंदोलन सुरू ठेवले आहे.
यावेळी सुनील महाले, जी.एन सूर्यवंशी, प्रवीण पाटील, सुनील देवरे, निलेश पोळ, सहदेव पाटील, प्रदीप जाधव, शेखर पाटील, नितीन पाटील, संजय पाटील, अरुण पाटील, विजय महाजन, दीपक चौधरी, गजानन ओतारी, श्रीकांत खैरनार, जय सोनवणे या कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या प्रवासाने देखील रक्तदान करून या आंदोलनाला पाठिंबा दिला. रक्तदानासाठी जीवन ज्योती ब्लड बँक मनोहर पाटील यांचे सहकार्य लाभले.