• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाबा रामदेव विरोधात IMA ची आक्रमक भूमिका : गुन्हा दाखल करण्याची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 22, 2021
in क्राईम, राष्ट्रीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

योग गुरु बाबा रामदेव यांनी नुकतीच अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. या टीकेच्या अनुषंगाने इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला असून केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दिल्लीतील सफदरजंग येथील रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या असोसिएशनने बाबा रामदेव यांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सोशल मीडियामध्ये बाबा रामदेव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये ते अ‍ॅलोपॅथी उपाचर पद्धतीविरोधात बोलताना दिसत आहेत. याची गंभीर देखल IMA नं घेतली असून याबाबत एक प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे. यामध्ये बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओत अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या आरोपांचा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी स्विकार करावा आणि देशातील ही आधुनिक चिकित्सापद्धती बंद करावी अथवा बाबा रामदेव यांच्यावर महामारी रोग अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

“भारत सध्या कोविड-१९ महामारीचा सामना करत आहे. या बिकट काळात अ‍ॅलोपॅथी ही आधुनिक चिकित्सा पद्धती आणि भारत सरकार मिळून लोकांची जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आहेत. या संर्घषात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या १२०० अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांनी आपलं बलिदान दिलं आहे.” असे या प्रेसनोट मध्ये नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, प्रेसनोटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना उद्देशून IMA नं म्हटलं की, व्हिडिओत बाबा रामदेव म्हणतात “अ‍ॅलोपॅथी एक मूर्ख आणि दिवाळ काढणारं विज्ञान आहे.” पण जेव्हा बाबा रामदेव आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण हे आजारी पडतात तेव्हा ते देखील या अ‍ॅलोपॅथीच औषधं घेतात. त्यामुळे बाबा रामदेव अ‍ॅलोपॅथीवर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण रामदेव बाबांना बेकायदा आणि मंजुरी नसलेली औषध विकायची आहेत”

व्हायरल व्हिडिओमध्ये बाब रामदेव म्हणतात, “कोविड-१९ महामारीमुळे होत असलेल्या मृत्यूंमागे अ‍ॅलोपॅथीचं कारण सांगण्यात आलं आहे. अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊनच लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये न गेल्यानं आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झालेल्या मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू अ‍ॅलोपॅथीची औषधं खाऊन झाले आहेत”.

बाबा रामदेव यांच्या अ‍ॅलोपॅथीविरोधातील या विधानामुळं सध्या कोविड संकटात रुग्णालयांमध्ये आपला जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स आणि हेल्थवर्कर्समध्ये मोठा रोष निर्माण झाला आहे.

Tags: allopathycoronadr harsh vardhanIMAswami ramdev
Previous Post

चक्री वादळाला लाजवेल असा तुमच्या दौऱ्याचा वेग होता – संदीप देशपांडे

Next Post

विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा कारण ते ब्लॅक फंगस आहेत – खा. संजय राऊत

Next Post

विरोधकांच्या टिकेकडे दुर्लक्ष करा कारण ते ब्लॅक फंगस आहेत - खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!