• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 23, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

धुळे राजमुद्रा दर्पण | धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.त्यापूर्वी श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस (गुरुद्वारा मागे) येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माजी मंत्री गिरीष भाऊ महाजन म्हणाले, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अमरिशभाई पटेल यांचे एकमेव नाव पक्षाकडे आले, भाईंचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. दिल्ली येथून देखील पक्षाने भाईंचे प्राधान्याने नाव पुढे केले. आपला विजय 100 टक्के नक्की आहे, सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावे. सर्व मतदार यांना सोबत घेऊन आपण काम करावे, भाजपाची ताकद सर्वत्र वाढतेय व वाढवायचीय.भाईंच्या कामाची पध्दत उत्कृष्ट आहे. ते सर्व पक्षाला घेऊन चालतात, भाई कोहिनूर हिरा आहेत, भाईंना शुभेच्छा देतो.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भाजपा कार्यकर्ते परिश्रमातून पुढे आले आहेत, अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. विधान परिषदेत भाई यांच्या सारखे तज्ज्ञ व्यक्ती यांची गरज आहे. भाईंनी शिक्षण, राजकीय व सर्वच क्षेत्रात अतुलनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक निवडणूक होईल. भाई हे जनतेत जावून काम करणारे नेते म्हणून भाई हे लोकप्रिय आहेत. भाईंनी जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच काम केले आहे. पक्ष कोणताही असो ते सतत विकासासाठी काम करतात. धुळे नंदुरबार दोन्ही जिल्ह्यात सर्व नेते यांच्यात स्नेहभाव आज देखील आहे.

डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, सर्वपक्षीय भाईंचे मित्र आहेत. भाईंचे सर्वच क्षेत्रात कार्य मोठे आहे. भाईंना सर्वजण ओळखतात. त्यांचे कार्य उज्ज्वल आहे. त्यांना सर्व पक्ष मानतात. त्यांना विजयासाठी शुभेच्छा देतो.

माजी मंत्री अमरिशभाई पटेल म्हणाले, भाजपा हा विचारधारा असलेला पक्ष आहे. माझे घर सर्वांसाठी खुले आहे. सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दोन्ही जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे. एक परिवार म्हणून आपण काम करु या.

खा. डॉ. हिनाताई गावित म्हणाल्या, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश घेतल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. 2 वर्षे बाकी असतांना भाईंनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवून ते पुन्हा विजयी झाले. शिस्तप्रिय भाई सर्वांना घेऊन चालतात, ही अभिमानाची बाब आहे.

खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश केला आपण सर्व जण भाग्यवान आहोत. भाई तुमचाच विजय पक्का आहे, आपणांस सर्व पक्षात आदर आहे. भाई महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील.

धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून भाईंना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार गिरीषभाऊ महाजन, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, भाजपा संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. सुभाष बाबा भामरे, खा. डॉ. हिनाताई गावित, उमेदवार माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांच्यासह आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मकरंद पाटील, अजय परदेशी, शिवाजीराव दहिते, कुसुमताई निकम, धरती देवरे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, कामराज निकम, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सुभाष देवरे, मनोहर भदाणे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, डॉ. सुप्रिया गावित, सुरेश पाटील, बापू खलाणे, नबू पिंजारी, जितेंद्र सूर्यवंशी, संग्राम पाटील, संजय जाधव, दीपक भोसले, सुनिल बैसाणे, देवेंद्र पाटील, किशोर माळी वाघाडी, हेमंत पाटील, प्रतिभा चौधरी, प्रा. अरविंद जाधव, हिरामण गवळी, नरेंद्रसिंह सिसोदिया, राहुल रंधे, बंटी मासुळे, भिकन वारुडे, राजेंद्र देसले, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, राहुल दंदे,शीतल नवले, भाऊसाहेब देसले, विजय पाटील, सत्तरसिंग पावरा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी तर सूत्रसंचालन प्रभाकरराव चव्हाण यांनी केले. आभार प्रभाकरराव चव्हाण यांनी मानले.

Tags: amrish patel shirapurbjpbjp vs mahavikas aaghadidhuledr subhash bhamredr vijay Kumar gavitgirish mahajanjalgaon jilhanandurbarncpvidhan parishadvijaykumar raval
Previous Post

सुरु झालेल्या बसवर दगडफेक; ‘त्‍या’ नवीन चालकांमध्‍ये भितीचे वातावरण….

Next Post

उरली सुरली अब्रूही गेली….गिरीश महाजनांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे पत्र

Next Post
उरली सुरली अब्रूही गेली….गिरीश महाजनांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे पत्र

उरली सुरली अब्रूही गेली....गिरीश महाजनांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!