• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील ६२९ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात; लवकरच निवडणूका होणार…

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 24, 2021
in जळगाव
0
जिल्ह्यातील ६२९ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुक प्रक्रियेला सुरुवात; लवकरच निवडणूका होणार…
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण । कृषी उत्पन्न बाजार समितीपूर्वी या निवडणुका होणार असल्याने मतदानाच्या हक्कापासून कुणी वंचित राहणार नाही, असे सहकार विभागाने न्यायालयात नमूद केलेले आहे. जिल्ह्यातील ६२९ विविध कार्यकारी सोसायटींच्या संचालक मंडळाचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. त्यापैकी अकरा सोसायटींच्या मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितींची निवडणूक प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक कार्यालयातर्फे सुरू करण्यात आली होती. चाळीसगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, चोपडा व रावेर या सहा कृउबासच्या प्राथमिक मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यावर हरकती देखील मागवण्यात आलेल्या होत्या. जळगाव, भुसावळ, बोदवड, जामनेर, यावल, धरणगाव या सहा कृउबासच्या तात्पुरत्या मतदार याद्या तयार करण्यासाठी गटविकास अधिकारी, सहायक निबंधक व सचिवांना याबाबत पत्र देण्यात आले होते.

जिल्ह्यातील चाळीसगाव, अमळनेर व पाचोरा या तीन कृउबासमध्ये प्रशासक मंडळ कार्यरत आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रशासक तर उर्वरित बाजार समित्यांमध्ये संचालक मंडळ कार्यरत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुका घेण्यापूर्वी मुदत संपलेल्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांसारख्या बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आलेल्या होत्या. त्या अनुषंगाने कृउबासच्या निवडणुकांपूर्वी सोसायट्यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

बाजार समितींच्या कार्यक्षेत्रातील कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्थांचे संचालक व ग्रामपंचायतीचे सदस्य हे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार होणार आहेत. विविध कार्यकारी सहकारी संस्थांसारख्या बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्य हे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार असल्याने ज्या सहकारी संस्थेची निवडणूक झाली नसेल त्या संस्थेचे निवडून येणारे संचालक हे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत. बाजार समितीची निवडणूक घेण्यापूर्वी ज्या सहकारी संस्थांचे संचालक बाजार समितीचे मतदार आहे, त्या सहकारी संस्थांचे संचालक हे बाजार समितीचे मतदार आहे.

 

Tags: jalgaon
Previous Post

राज्यसेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी परीक्षा घेण्याचं निश्चित…

Next Post

अखेर वादग्रस्त कृषी कायदे रद्द; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार….

Next Post
अखेर वादग्रस्त कृषी कायदे रद्द; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार….

अखेर वादग्रस्त कृषी कायदे रद्द; 29 नोव्हेंबरला विधेयक सादर होणार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!