• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांना राजयोग ; न्यायालयाच्या निर्णयाने फिरली चक्रे..

Kamlesh Devre by Kamlesh Devre
November 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

जळगाव राजमुद्रा दर्पण | माजी परिवहन व कृषिमंत्री राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांना घरकुल प्रकरणातील झालेल्या शिक्षेमुळे निवडणूक लढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती यावरून याचिकाकर्ते यांचा दावा सर्वाच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मोठा दिलासा माजी मंत्री देवकरांना मिळाला आहे. जिल्हा बँकेतील संचालक पदाच्या निवडणुकी ला उमेदवारी करीत असल्याने सामाजिक कार्यकर्ते पवन ठाकूर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. घरकुल प्रकरणात मी फक्त सयाजीराव असा दावा करणारे देवकर यांना न्यायालयाने घरकुल प्रकरणात शिक्षा ठोठावली होती. यामुळे त्यांना कारावास देखिल भोगावा लागला होता. या कार्यकाळात बराच वेळ राजकीय प्रवाहातून बाहेर राहिल्याने त्याचे विधानसभेतील विरोधक असलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पारडे अधिक जड राहिले यामुळे दोन वेळा मंत्री पदे पाटील यांना मिळाली. देवकरांना मात्र उभा कायदेशीर व राजकीय संघर्ष करावा लागला.

तत्कालीन नगराध्यक्ष असलेले माजी मंत्री गुलाबराव देवकर घरकुल प्रकरणातील आरोपी असल्याने त्यांना शिक्षा लागली यामुळे त्यांची भारतीय कायदेशीर नियमानुसार त्यांची राजकीय महत्वकांक्षा भंगली होती. अशीच काही कारणामुळे देवकरांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवणे टाळले. मात्र पुढील निवडणूका लढण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झाला असून  सर्वाच्च न्यायालयाने दिलेला निर्णय त्यांच्या राजकीय भवितव्याला नवी उभारी देणारा ठरला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत घरकुल घोटाळ्यात शिक्षा लागली असली कारणाने त्यांच्या उमेदवारी वर घेण्यात आलेला आक्षेप घेण्यात आला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे.  जिल्ह्यातील राजकीय क्षितिजावर माजी मंत्री देवकरांना पुन्हा राजयोग अशी चर्चा न्यायालयाच्या निर्णयामुळे सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या सहकारातील जिल्हा बॅंकेची रणधुमाळीत महाविकास आघाडीला घवघवीत यश आल्याचे समोर आले यामध्ये राष्ट्रवादीचे तब्बल 11 उमेदवार बिनविरोध झाले देवकरांना मात्र अग्नी परीक्षा द्यावी लागली त्यात देखील ते यशस्वी झाले इतर संस्था मतदार संघाततुन मतदारांनी एकतर्फी निकाल देत देवकरांना विजयी केले आता  जिल्ह्या बँकेतील चेरमन पदासाठी त्यांचेच नाव आघाडीवर असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांकडून समजते आहे. या वृत्ताला राष्ट्रवादीचे जिल्ह्या बँकेतील संचालक असलेल्या महत्वपूर्ण नेत्यांनी दुजोरा देखील दिला आहे. यामुळे देवकर हेच जिल्हा बँकेतील चेरमन होतील हे निश्चित मानले जात आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवकर यांच्या नावाला पसंती दर्शवली असल्याचे समजते आहे. जिल्ह्यातील एकमेव असलेल्या प्रमुख पदाकरिता संधी मिळत असल्याने यामुळे राजकारणाच्या  प्रवाहात माजी मंत्री देवकारांची बाजू पुन्हा भक्कम होणार आहे.

Tags: bjp vs mahavikas aaghadibjp-rashtrawdieknath khadsegharkul ghotalagulabao patilgulabrao devakarjalgaon jilhancpsahkarshivsenashrad pawar
Previous Post

केंद्रीय नेतृत्वाच्या विश्वासामुळे फडणवीसांनी प्रतिस्पर्धी संपविले: माजी मंत्री एकनाथराव खडसे

Next Post

अमरिश पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा; सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार….

Next Post

अमरिश पटेल यांच्या विजयाचा मार्ग मोकळा; सलग चौथ्यांदा विधान परिषदेत जाणार....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!