• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 24, 2021
in जळगाव
0
शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा
Spread the love

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा)

जळगाव शहरातील शिवाजी नगर  उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षा पासुन अत्यंत कासव गतीने सुरू आहे. सदर काम पुर्ण करण्याची मुदत संपली असुन मक्तेदार आदित्य खटोड यांना भुसावळ रेल्वे DRM विवेक कुमार गुप्ता, Sr.DEN राजेश चिखले तसेच सार्वजनिक बांधकामं अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांचा छुपा आशीर्वाद (पाठिंबा) असल्याचा आरोप सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रा.संजय मोरे यांनी केला आहे.

“दोन वर्ष पुर्ण होऊन देखील शिवाजी नगर उड्डाण पुलाचे बांधकाम अपूर्ण असून कासव गतीने सुरू आहे. दोन वर्षा पासुन नागरिकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांना मानसिक,  शारीरिक तसेच आर्थिक त्रास होत आहे. अगोदरच दोन वर्षा पासून संपुर्ण देशासह  महाराष्ट्रात कोरोना या महाभयंकर आजाराने थैमान घातले असुन लोकांना रोजगार नाही. अशातच हा येण्याजाण्याचा भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. या परिसरातील नागरिकांना व दुचाकी वाहन धारकांना फिरून जावे लागत असून पैसा व वेळचा अपव्यय होत आहे. महत्वाचे काम वेळेत पुर्ण  होत नाही.” असे संजय मोरे यांनी म्हटल आहे.

मुदतीत बाधकाम पुर्ण झाले नाही त्यास जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी केला आहे. सार्वजानिक बाधकाम, विभागाच्या कोणतेही अभियंताचे या कामावर लक्ष नाही. सा. बा. उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुभाष राऊत  यांची जबाबदारी असताना देखील ते वर्ष भरा पासुन या कामावर आलेले नाहीत. सुभाष राऊत यांच्याकडे, सा.बा.उपविभाग, भडगाव यांचाही तातपुरता चार्ज आहे. त्यामुळे त्यांचे या कामावर लक्ष नाही. जाणुन बुजुन  भुसावळ रेल्वे DRM विवेक कुमार गुप्ता,Sr.DEN राजेश चिखले, प्रशांत सोनवणे, सा. बा. अधिक्षक अभियंता,  गजेन्द्र सिंग राजपुत सा. बा. कार्यकारी अभियंता, यांचा छुपा पाठिंबा (आशीर्वाद) आहे. हे अधिकारी, जाणुन बुजुन मक्तेदार आदित्य खटोड यांना पाठीशी घालत असुन, सर्वांनी संगनमत करुन महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारची याची दिशाभुल करत आहेत. कामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असून या कामामध्ये कारोडो रुपयाचा भ्रष्ट्राचार होण्याची शक्यता आहे. असा आरोप प्रा. मोरे यांनी केला आहे.

नागरिकांना व दुचाकी वाहन धारकांना तात्पुरता येणे जाण्याचा मार्ग निर्माण करावा. कामामध्ये, सुधारणा होऊन कामाची गती वाढवावी अश्या मागण्या करत कामाचा दर्जा न सुधारल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रिय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजानिक बाधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कडे तक्रार करण्यात येण्याचा इशारा प्रा. संजय मोरे येंनी दिला आहे.

Tags: jalgaonrajmudrasanjay moreshivaji nagar uddan pul
Previous Post

भाजपा व्यापारी जिल्हा आघाडी अध्यक्षपदी कांतीलाल जैन यांची फेरनिवड

Next Post

वीज कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन मागे घेण्याचे उर्जामंर्त्र्यांचे आवाहन

Next Post

वीज कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन मागे घेण्याचे उर्जामंर्त्र्यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!