• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारायण राणेंची राज्य सरकारवर जोरदार टीका

Kamlesh Devre by Kamlesh Devre
May 26, 2021
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

(राजमुद्रा वृत्तसेवा)

सध्याचं राज्य सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं हे सरकार असून करोनाच्या औषधासाठी काढलेल्या टेंडरमध्येही या सरकारनं भ्रष्टाचार केला असल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. लवकरच या सरकारचा भ्रष्टाचार आपण उघडा करणार असल्याचंही नारायण राणेंनी सांगितलंं.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर जबरदस्त टीका केली असून सध्याचं सरकार हे महाराष्ट्राचं शोषण करणारं सरकार आहे, त्यांच्या सगळ्या खात्यांमधला भ्रष्टाचार आपण पुराव्यानिशी उघड कऱणार असल्याचा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या लायकीचे नाहीत असं वक्तव्य करत मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक प्रहार केला आहे. संजय राऊत, महाविकास आघाडी यांच्या कारभारावर त्यांनी कडक भाषेत ताशेरे ओढले आहेत.

या सरकारने करोनाच्या औषधांसाठी काढलेल्या टेंडरमध्येही भ्रष्टाचार केला आहे. लसींचं टेंडर रद्द का केलं? राऊतांनी उत्तर द्यावं, असंही ते यावेळी म्हणाले. संजय राऊत प्रत्येक वेळी केंद्रावर, मोदींवर बोट ठेवतात, मग सरकारनं सरळ केंद्रातच विलीन व्हावं असंही राणे म्हणाले. सोबतच कोरोना संपवणं या सरकारच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. उलट कोरोना या सत्ताधाऱ्यांना लाभदायक आहे. त्यांना यानिमित्ताने पैसे खायला मिळाले असाही आरोप केला आहे.

सरकारनं लोकांना वाचवण्यासाठी आत्तापर्यंत काहीही केलं नाही. ना लसी आहेत, ना व्हेंटिलेटर्स आहेत. काहीच नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. जनाची नाही तर मनाचीही नसलेलं हे सरकार असून ते मुख्यमंत्री पदाच्या लायकीचंच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावरुन त्यांनी उदय सामंतांनाही चांगलंच सुनावलं आहे. आपलं पक्षात काय स्थान आहे हे ओळखून गाठीभेटी घ्याव्यात असा सल्लाही राणेंनी दिला आहे. मराठा आरक्षण मिळालं नाही याला संपूर्णपणे उद्धव ठाकरे जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. न्यायालयासमोर मराठा आरक्षणासंदर्भातली जी माहिती द्यायला हवी होती, ती या सरकारने दिलीच नाही असा आरोपही राणे यांनी केला आहे.

सामनाच्या अग्रलेखावरुन संजय राऊतांनाही खडे बोल सुनावले आहेत. या विषयावर बोलतांना राणे म्हणाले “भुताटकी मातोश्रीवर आहे, मंत्रालयात आहे. तिथे शांतीयज्ञ करुन घ्या.” असा सल्ला दिला. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा हा नौटंकी दौरा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्र्यांनी कोकणाला काहीही दिलं नाही, कोकणच्या विकासासाठी काहीही केलं नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Tags: coronamaharashtramukhyamantri uddhav thakrenarayan ranesanjay raut
Previous Post

सोनू जलानचा परमबीर सिंग यांच्यावर खळबळजनक आरोप

Next Post

स्वामी रामदेव – IMA वाद अधिक चिघळला

Next Post

स्वामी रामदेव - IMA वाद अधिक चिघळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!