• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यावल-भुसावळ राज्य मार्गावरील रस्त्यावरील खड्डे तात्काळ दुरूस्त करा शिवसेनेची मागणी

Kamlesh Devre by Kamlesh Devre
January 7, 2022
in Uncategorized
0
यावल-भुसावळ राज्य मार्गावरील रस्त्यावरील खड्डे  तात्काळ दुरूस्त करा शिवसेनेची मागणी
Spread the love

यावल ( प्रतिनिधी )
येथील यावल हुन भुसावळकडे जाणाऱ्या राज्य मार्गावरील रस्त्याचे करण्यात आलेल्या डांबरीकरणाचे काम हे निकृष्ठ प्रतिचे करण्यात आल्याने रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असुन, वाहनधारकांना या रस्त्याने वाहने घेवुन जातांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन यासंदर्भात एक लिखित तक्रार शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहे . यावल सार्वजनिक बांधकाम विभागास शिवसेना जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील , शिसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे , शिवसेनेचे तालुका उपप्रमुख शरद कोळी , यावल शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात शिवसेने म्हटले आहे की , काही दिवसापुर्वीच यावल तालुक्याचे माजी आमदार कै . हरीभाऊ जावळे यांच्या निधीतुन लाखो रुपये खर्च करून यावल ते भुसावळ या दरम्यानच्या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व दुरुस्त करण्यात आले होते हे काम संबधीत ठेकेदाराच्या माध्यमातुन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने यापुर्वी ही सदरच्या कामाची तात्काळ चौकशी करून कामाची गुणंवत्ता व दर्जा चांगला व सुधारावा अशी तक्रार शिवसेनेच्या माध्यमातुन करण्यात आली होती . परन्तु सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे . यावल ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गांव ते जुना अंजाळे घाट पोलीस चौकी पर्यंतच्या पुर्ण रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली असून संपुर्ण रस्तावर ठीकठीकाणी खड्डे पडल्याने रस्ता खड्डेमय झाला असुन , या मार्गावरील रस्त्यावर मोठे अपघात होण्याची शक्यता असल्याचे सेनेने म्हटले असुन या खड्डयातुन दुचाकी व इतर मोटर वाहन चालवितांना वाहनधारकांना पाठदुखी , कंबरदुखी व अंगदुखीचे शारीरिक आजारास सामोरे जावे लागत आहे . या आदीच मार्गावरील बनविलेला रस्ता अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले असल्याने सदरच्या कामाची पुनश्च नव्याने दुरुस्ती करून डांबरीकरण करणे गरजे आहे . तरी सार्वजनिक बांधकाम विभाग यावलच्या वतीने संबधीत ठेकेदाराकडुन सदरच्या मार्गावरील निमगाव गावाजवळील व राजोरा फाटा ते अंजाळे गांव दरम्यानच्या रस्त्याची गुणवत्तापूर्वक दर्जा राखुन डांबरीकरण करावे तसे न झाल्यास व प्रसंगी या मार्गावरील रस्त्यावर अपघात होवुन जिवित व वित्तियहानी झाल्यास संबधीत ठेकेदार व सार्यजनिक बांधकाम विभाग यावलचे अधिकारी यांची असेल , तरी तात्काळ
या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेना आक्रमक भुमीका घेवुन आंदोलन करेल असा ईशारा ही निवेदनाव्दारे देण्यात आला असुन , सा.बां . वि. यावलचे विकास जंजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, शहरप्रमुख जगदीश कवडीवाले , सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील , तालुका उपप्रमुख शरद कोळी , आदीवासी सेनेचे हुसैन तडवी , अजहर खाटीक , पप्पु जोशी , संतोष धोबी, भरत चौधरी , संतोष वाघ , सागर देवांग , योगेश पाटील , योगेश चौधरी , किरण बारी, नामदेव अडकमोल, अनिल पाटील , प्रविण लोणारी आदीं शिवसेनीकाच्या स्वाक्षरी आहेत.

Previous Post

राहुल युवा संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी प्रतिक सुर्वे यांची निवड

Next Post

भडगाव तालुका तंबाखू मुक्त शाळेचा प्रथम क्रमांक आणू गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी

Next Post
भडगाव तालुका तंबाखू मुक्त शाळेचा प्रथम क्रमांक आणू गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी

भडगाव तालुका तंबाखू मुक्त शाळेचा प्रथम क्रमांक आणू गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!