• Home
  • Sample Page
erajmudra.com
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
No Result
View All Result
erajmudra.com
No Result
View All Result
ADVERTISEMENT

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांकडून व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह सादर ; मविआ नेत्यांचा पर्दाफाश ?

Kamlesh Devre by Kamlesh Devre
March 8, 2022
in महाराष्ट्र, राजकीय
0
Spread the love

मुंबई राजमुद्रा दर्पण : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्य सरकार आणि विशेष सरकारी वकिलावर “भाजप आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी षडयंत्रं रचलं होतं”, असा गंभीर आरोप ‘पुराव्यासहित’ केला आहे.हे षडयंत्र कसं रचलं जात होतं, त्याचे व्हिडीओ असलेला एक पेनड्राईव्हच फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिल्याने खळबळ माजली आहे.

तसेच प्रत्येक व्हिडीओत कुणाचा काय काय संवाद आहे? याची सविस्तर माहिती दिली.या व्हिडीओत कोण कोण संवाद साधत आहे? हेही त्यांनी सांगितलं.तसेच सरकारी वकिलाने कट कसा प्लांट करायचा, पुरावे कसे तयार करायचे, जबानी कशी नोंदवायची, साक्षीदाराने साक्ष काय द्यायची याची तयारी केल्याचंही फडणवीस यांनी विस्तृतपणे सभागृहात मांडले आहे. यावेळी सभागृहात विविध चर्चा रंगायला सुरुवात झाली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस …

2021 मध्ये गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्यात आला, 2018 पासून मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे.पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे.महाजनांच्या स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांनी अपहरण केल्याच केस करण्यात आली होती.

त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे असं सांगून मोका लावण्याचे कागदपत्रं तयार झाले.कोर्टाने महाजनांना दिलासा दिला. राज्य सरकार काय षडयंत्र करते ते सांगतो.

विरोधकांची कत्तल कशी करायची हे षडयंत्र शिजतंय.

विशेष सरकारी वकील प्रवीण पंडीत चव्हाण हे या षडयंत्राचे कर्ते असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या कडून करण्यात आला आहे. आमच्याही काळात आणि तुमच्याही काळात त्यांना केस दिल्या.महेश मोतेवार, रमेश कदम, सुरेश जैन, डिएचएल बँक आदी केसेस त्यांना दिल्या होत्या, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही कथा मोठी आहे.या कथेचं मटेरियल माझ्याकडे भरपूर आहे.त्यावर 25 वेबसीरीज बनतील इतकं मोठं मटेरियल आहे.त्याचा व्हिडीओ मी दिला आहे. सरकारी वकिलांचं कार्यालय हे विरोधकांविरोधातील षडयंत्र करण्याची जागा आहे.चाकू प्लांट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापासून ते ड्रग्जची रेड कशी करायची? रेड प्लांट कशी करायची? हा असा गुन्हेगारी स्वरुपाचा कट वकील रचत होते असा आरोप देखील करण्यात आला आहे. त्यात पोलीस आणि मंत्रीही आले.हे सर्व कुभांड रचलं गेलं.

एफआयआर देखील सरकारीवकिलांनी लिहून दिला. साक्षीदार सरकारी वकिलाने दिले. जबानी कशी नोंदवायची हे शिकवलं. रेड कशी करायची याची व्यवस्था केली. आमचे एक माजी नेते आता ते तुमच्या पक्षात आहे त्यांनी ही व्यवस्था केली. हॉटेल बुक केली. पैसे कसे द्यायचे हे झालं, असं त्यांनी सांगितलं.

ही सर्व कथा हे सरकारीवकील आपल्या तोंडाने सांगतील. प्रत्येक घटनेचा छोटा व्हिडीओही तयार केला. महाविकास आघाडीच्या कारागृहात गेलेल्या नेत्यांबाबतही त्यांनी खुलासा केला आहे. माझ्याकडे सव्वाशे तासाचं रेकॉर्डिंग आहे. आता मी निवडक भाग देतो. यातील काही भाग सभागृहाची इभ्रत घालवणारं आहे ते सांगू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात विधानसभा अध्यक्षांकडे पुरावे देताना सांगितलं.

Tags: . mahavikas aaghadib j p vs shivsenabjpbjp maharashtradevenda fadanvisgirish mahajanjalgaonmaharshtra polisncpshrad pawarudhav thakareupamukhmantri ajit pawarvidhansabha adhyksha
Previous Post

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस “ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

पंधरा महिलांना पिंक ऑटो रिक्षाचे शिकाऊ लायसन्स वितरण

Next Post

पंधरा महिलांना पिंक ऑटो रिक्षाचे शिकाऊ लायसन्स वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result

Recent Posts

  • श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश
  • उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार पायदळी तुडवले : रामदास कदमांचा आरोप
  • शेतकऱ्यांचा अपमान करणारे कृषीमंत्री कोकाटेंना सत्तेचा माज ; नाना पटोलेंचा हल्लाबोल
  • सुरेश धस अन धनंजय मुंडेंच्या भेटींन वादळ? सामाजिक कार्यकर्त्यांच्यां आरोपांन खळबळ.
  • कोकणात ठाकरेंचा तडकाफडकी निर्णय ; या “तीन ” प्रमुख नेत्यांची हकालपट्टी?

Recent Comments

  • skyreveryCeM on पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिम्मित रसलपूर येथे भव्य लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न
  • topdirectory4u.net on जनमत प्रतिष्ठानतर्फे मन्यारखेडा शिवारामध्ये अन्नदान
  • सुशांत खडसे on राज्यशासनाकडून लोककलावंतांना अर्थसहाय्य – अमित देशमुख
  • Viiiiiiil on शहराचा ‘चेहरा मोहरा’ बदलविणार – महापौर जयश्री महाजन
  • Viiiiiiil on राज्यात सत्ता असूनही नियोजनाअभावी नागरिकांच्या पदरी रस्त्यांविषयी निराशाच..
  • Home
  • Sample Page

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • जळगाव
  • धुळे
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Don`t copy text!